Video : धोतर घालून मॉलमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला, घटनेनंतर मोठा गदारोळ

WhatsApp Group

Farmer Denied Entry To Mall : अलीकडेच, बंगळुरूच्या प्रसिद्ध जीटी मॉलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला. शेतकरी संघटनांनी आंदोलन करत मॉल व्यवस्थापकावर कारवाईची मागणी केली. आता कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने कारवाई केली आहे. सरकारने जीटी मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले.

बंगळुरूमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याला त्याच्या पोशाखामुळे मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. शेतकरी आपल्या मुलासोबत चित्रपट पाहण्यासाठी मॉलमध्ये आला होता. या घटनेने दुखावलेल्या शेतकरी आणि त्याच्या मुलाने एका व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचारी आणि मॉलच्या व्यवस्थापकावर गंभीर आरोप केले होते. व्हिडिओमध्ये शेतकरी आणि त्याचा मुलगा सांगत होते की, त्यांना त्यांच्या कपड्यांमुळे मॉलमध्ये प्रवेश कसा दिला गेला नाही.

कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि कर्नाटकचे नगरविकास मंत्री बिर्थी सुरेश यांनी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. विधानसभेत बोलताना सुरेश म्हणाले, “कायद्यानुसार, सरकार सात दिवसांसाठी मॉल बंद करत आहे. मी ब्रुहत बंगळुरू महानगरपालिकेच्या (बीबीएमपी) अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि या घटनेवर कारवाई म्हणून मॉल सात दिवस बंद करण्यात येत आहे.”

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फकीरप्पा, 70 वर्षीय शेतकरी आणि त्यांचा मुलगा नागराज यांना तिकीट असूनही मॉलमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, धोतर परिधान केलेले लोक मॉलच्या नियमानुसार प्रवेश करू शकत नाहीत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना नागराजने सरकारला कारवाई करण्याची विनंती केली होती.

शेतकरी गटांची मॉलबाहेर निदर्शने

या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक शेतकरी संघटनांनी निषेध केला आणि मॉल व्यवस्थापनाने शेतकऱ्याची माफी मागावी अशी मागणी केली. अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खानने इंस्टाग्रामवर या घटनेचा निषेध केला आहे. “हे अत्यंत लज्जास्पद आहे. मॉलवर कठोर कारवाई व्हायला हवी. हा भारत आहे आणि आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान असायला हवा”, असे गौहरने सांगितले.

बंगळुरूमध्ये यापूर्वीही अशीच एक घटना समोर आली होती, जेव्हा एका व्यक्तीला त्याच्या पोशाखामुळे मेट्रो स्टेशनवर प्रवेश दिला नव्हता. नंतर बीएमआरसीएलने या घटनेत सहभागी असलेल्यांना निलंबित केले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment