Video : जर्मनीत काम केलेला इंजीनियर आता बंगळुरूच्या रस्त्यावर भीक मागतोय!

WhatsApp Group

Bengaluru Engineer Begging Video : भारतात बेरोजगारीचा स्तर किती उंचावला आहे, याचा प्रत्यय एका व्हायरल व्हिडिओतून समोर आला आहे. बंगळुरूच्या रस्त्यावर भीक मागणारा एक माणूस आपल्या दुःखद कहाणीने सर्वांनाच हादरवत आहे. एका कंटेंट क्रिएटरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात जीवन किती अनिश्चिततेचे आहे, हे दिसत आहे.

एका कंटेंट क्रिएटरला बंगळुरूच्या रस्त्यावर एक भीक मागणारी व्यक्ती सापडली. सुरुवातीला तो माणूस सामान्य भिकाऱ्यासारखा दिसत होता, त्याच्या अंगावर जुना गुलाबी टी-शर्ट आणि जीन्स होती. पण कंटेंट क्रिएटरने त्याच्याशी बोलताच तो माणूस अगदी सहज इंग्रजी बोलत असल्याचे त्याला दिसले.

हेही वाचा – CNG Price Hike : विधानसभेचे मतदान होताच ‘सीएनजी’च्या दरात वाढ!

पुढील संभाषणात, त्या व्यक्तीने सांगितले की तो एकेकाळी यशस्वी इंजीनियर होता. बंगळुरू येथील ग्लोबल व्हिलेज आणि फ्रँकफर्ट, जर्मनी सारख्या प्रतिष्ठित ठिकाणी त्याने काम केले होते. त्याचे जीवन पूर्णपणे स्थिर आणि आनंदी होते, परंतु त्याच्या आयुष्यात एक भयानक वळण आले जेव्हा त्याचे पालक अचानक मरण पावले. हे दु:ख सहन न झाल्याने तो दारूच्या व्यसनात पडला आणि या व्यसनामुळे त्याचे करिअरच नाही तर आयुष्यातील स्थिरता आणि ध्येयही हिरावले गेले.

कालांतराने त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती बिघडली आणि त्याने आपले जुने आयुष्य सोडून दिले. दारूच्या व्यसनाने त्याचा पूर्णपणे नाश झाला आणि त्याला बंगळुरूच्या रस्त्यावर भीक मागावी लागली. त्या माणसाची कहाणी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, कारण या शहरात जिथे मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी आणि इंजीनियर्स काम करतात, एकेकाळी आयुष्य सुधारण्याची संधी मिळालेली ही व्यक्ती आता रस्त्यावर आली होती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment