Artificial Intelligence : एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) ने बनवलेले भगवान श्री राम यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. असे म्हटले जात आहे की जेव्हा भगवान राम 21 वर्षांचे होते तेव्हा ते असे दिसायचे. दुसऱ्या फोटोत ते हसताना दिसत आहे. या दोन्ही फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
फोटो शेअर करताना, बहुतेक लोक कॅप्शनमध्ये लिहित आहेत की वाल्मिकी रामायण, रामचरितमानससह सर्व ग्रंथांमध्ये दिलेल्या तपशीलानुसार, हा भगवान श्री रामचंद्रजींचा एआय जनरेट केलेला फोटो आहे. वयाच्या 21 व्या वर्षी ते असे दिसायचे. प्रभू रामाचे मनमोहक चित्र पाहून लोक म्हणतात की आजपर्यंत पृथ्वीवर इतका देखणा कोणीही जन्माला आलेला नाही.
🔸AI's depiction of Prabhu Shri Ram at age 21 pic.twitter.com/iR8zmehiIh
— Kreately.in (@KreatelyMedia) April 11, 2023
हेही वाचा – Petrol Pump : पेट्रोल पंप कसा उघडायचा? कोणत्या गोष्टी लागतात? जाणून घ्या सर्वकाही!
आर्टिफिशियल इंटेलिजेंसने काही ठिकाणांची जनरेट केलेले फोटोही समोर आले आहेत. ताजमहालच्या बांधकामाशी संबंधित फोटोही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ताजमहालची रचना आणि त्यासमोर मजूर काम करताना दिसतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!