‘वाघ-बकरी चहा’च्या मालकाचे निधन, मॉर्निंग वॉक करताना कुत्र्यांनी हल्ला केला आणि…

WhatsApp Group

Wagh Bakri Tea Company Owner Death : वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे रविवारी सायंकाळी अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. वृत्तानुसार, 49 वर्षीय देसाई यांच्या घराबाहेर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचा मृत्यू झाला.

अहमदाबाद मिररच्या वृत्तानुसार, देसाई 15 ऑक्टोबर रोजी सकाळी इस्कॉन आंबली रोडजवळ मॉर्निंग वॉक करताना कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. कुत्र्याच्या या हल्ल्यामुळे ते खाली पडले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यांच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाने तात्काळ त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली, त्यांनी देसाईंना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, एक दिवसानंतर त्यांना डोक्याच्या ऑपरेशनसाठी झायडस रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Horoscope Today In Marathi : आठवड्याच्या पहिल्या दिवशी ‘या’ राशींच्या लोकांना आशीर्वाद, करिअरमध्ये प्रगती आणि चांगली बातमी

देसाई हे वाघ बकरी चहा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रेशेश देसाई यांचे पुत्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि मुलगी परिशा असा परिवार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment