VIDEO : काय तो रस्ता, काय ते संगीत, संगळं कसं ओक्केमध्ये! ‘असा’ म्यूझिकल रोड पाहिलाय का?

WhatsApp Group

मुंबई : सध्या गाडी घ्यायचं म्हटलं की आपल्या रस्त्यांची अवस्था बघून मनात भीतीचं वातावरण तयार होतं. याशिवाय, वाढती महागाई, ट्रॅफिक जाम या समस्या आहेतच. पण चांगल्या रस्त्यांची कमतरता हा प्रमुख विषय आहे. अशा घाणेरड्या रस्त्यांसाठी लाखांच्या गाड्या कशासाठी घ्यायच्या, असा प्रश्न सामान्यांच्या मनात हमखास येतो. पण खड्डे नसलेल्या अप्रतिम रस्त्यावर चालण्याची मजा काही औरच. रस्ता जितका आरामदायी तितका प्रवास अधिक मजेशीर. या दरम्यान लोक वाहनांमध्ये आवडतं संगीत वाजवून रस्त्याच्या प्रवासाचा आनंद घेतात. पण रस्त्यामुळं तुम्हाला संगीत ऐकायला येईल, असा विचार कधी केलाय का? असा एक रस्ता आहे, जो इथे येणाऱ्या लोकांना संगीताचे सूर ऐकवतो.

आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं होऊ शकतं? दरम्यान अशा रस्त्याशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतः रस्त्यावरून येणारा आवाज ऐकू शकता. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की रस्त्यावर धावणारी वाहनं गंमत म्हणून संगीत ऐकवत आहेत.

संगीतमय रस्ता..

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पीड ब्रेकरवरून वाहन जात असताना संगीत ऐकू येतं. अशा प्रकारे प्रत्येक रस्त्यावर वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर बनवले असून प्रत्येक लहान-मोठ्या ब्रेकरला ओलांडताना वाहनाच्या टायरमधून एक प्रकारचा आवाज येतो. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला स्पीड ब्रेकरसारख्या छोट्या पट्ट्या बसवण्यात आल्याचे दिसत आहे, ज्यामुळे संगीताचा आवाज येतो. या पट्ट्यांवर जेव्हा जेव्हा वाहनाचा टायर चढतो तेव्हा एका विशिष्ट लयीत आवाज येतो, जो एखाद्या संगीतबद्ध संगीतासारखा वाटतो.

रस्त्यावरून संगीताचा आवाज का येतो?

म्युझिक नोटचा आवाज निर्माण करणारे हे बार स्लीपर लाइन्स, ऑडिबल लाइन्स किंवा वू वू बोर्ड म्हणूनही ओळखले जातात. जर तुम्ही रस्त्यावरील पांढरे पट्टे काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला असं वाटेल की ते पियानो किंवा हार्मोनियमसारखे सेट केले आहेत, जे टायरला आदळल्याने कंपन आणि आवाज निर्माण करतात. जगात अनेक ठिकाणी असे म्युझिकल स्ट्रीट्स अस्तित्वात आहेत. रस्त्यावर गाडी चालवताना बरेच स्पीडब्रेकर येतात. काही ब्रेकर लहान असतात आणि काही उंच असतात, परंतु काहीवेळा जेव्हा तुम्हाला वेग कमी करण्याची आवश्यकता असते तेव्हा रस्त्यावर अनेक ब्रेकर असतात. गाडीच्या आत बसलेल्या लोकांना ब्रेकर ओलांडताना टायरचा आवाज ऐकू येतो. त्याच ध्वनींना जर सूर दिलास तर ते संगीतासारखं वाटू शकते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment