Viral Video : धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक डॉक्टर महिलेच्या डोळ्यांमधून अनेक कॉन्टॅक्ट लेन्स काढताना दिसत आहे. कॅलिफोर्नियातील एका डॉक्टरने एका महिलेच्या डोळ्यात अडकलेल्या २३ कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या, ज्या ती रोज रात्री काढायला विसरायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन घालायची. डॉक्टरांनी त्याचा व्हिडिओ आणि फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
डॉ. कॅटरिना कुर्तिवाने १३ सप्टेंबरला हा व्हिडिओ पोस्ट केला होता, जो आता व्हायरल झाला आहे. डॉक्टर रुग्णाच्या डोळ्यातून एकामागून एक लेन्स कशी काढत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना डॉक्टरांनी लिहिले की, “एखाद्याच्या डोळ्यांमधून २३ कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या आहेत. हा माझ्या क्लिनिकचा वास्तविक जीवनातील व्हिडिओ आहे. कधीही लेन्स लावून झोपू नका.”
हेही वाचा – CM शिंदे यांचे माजी राष्ट्रपती डॉ. .ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन
लेन्सच्या रंगाचे स्पष्टीकरण देताना डॉक्टर म्हणाले, “अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स आधीपासून थोड्याशा निळ्या रंगाच्या टिंटसह येतात. मी ते काढण्यासाठी फ्लोरेक्स नावाचा विशेष डाग वापरला, त्यामुळे ते निळ्याऐवजी हिरवे दिसत आहेत.”