भारतात स्थायिक झालेली, भारताची संस्कृती दाखवणारी व्हायरल फिनलँडच्या मुलीची चर्चा!

WhatsApp Group

Viral Finland Girl During Mahakumbh 2025 : महाकुंभ संपण्यासाठी अजून १९ दिवस शिल्लक आहेत. या वर्षीच्या महाकुंभात, अनेकांनी त्यांच्या अनोख्या शैलीमुळे चर्चा रंगवल्या. यामध्ये आयआयटी बाबा अभय सिंह, सुंदर साध्वी हर्षा, माळा विक्रेती मोनालिसा आणि बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचा समावेश होता. पण आजकाल एक परदेशी युट्यूबर देखील चर्चेत आहे. तिने महाकुंभमेळ्याबाबत अनेक प्रेरक व्हिडिओ पोस्ट केले. यामध्ये तिने भारतीय संस्कृतीचे खूप कौतुक केले.

तिचे नाव कैसा ओलजाक्का (Kaisa Oljakka) आहे. कैसा ही फिनलंडची आहे. ती भारतीय संस्कृतीने इतकी प्रभावित झाली आहे की ती येथे स्थायिक झाली आहे. ती एक प्रसिद्ध युट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. कैसा अंकित कुमार नावाच्या तरुणासोबत अनेक व्हिडिओ पोस्ट करते. बरेच व्हिडिओ मजेदार असतात आणि बरेच असे असतात ज्यात लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल माहिती दिली जाते.

हेही वाचा – आता 50, 40, 25 लाखांच्या होम लोनवर किती कमी होणार EMI?

कैसा स्वतः देखील भारतीय पोशाखात दिसते. कैसाचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (videshi__indian) ३ लाख ३६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हजारो लोक तिला यूट्यूब आणि फेसबुकवर फॉलो करतात. कैसाने अलीकडेच बनारसच्या घाटांवर व्हिडिओ बनवले आहे. यामध्ये ती चहा विकताना दिसली. त्याच वेळी, तिने महाकुंभमेळ्यासंदर्भात एक व्हिडिओ देखील बनवला. यामध्ये, ती दातुन १० रुपयांना विकतेय. शिवाय त्याचे महत्त्वही लोकांना सांगताना दिसली.

जर तुम्ही तिचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की तिला भारतीय संस्कृतीबद्दल किती ज्ञान आहे. ती इतर लोकांना भारतीय संस्कृतीकडे प्रेरित करत राहते. याशिवाय ती क्रिकेट आणि बॉलिवूडवर अनेक व्हिडिओ बनवते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!  

Leave a comment