VIDEO : अरे बापरे..! ५० फुटांवरून खाली कोसळला आकाशपाळणा; दणकन आपटले लोक!

WhatsApp Group

Mohali Swing Accident : पंजाबच्या मोहालीमधून मोठी बातमी समोर आली आहे, जिथे दसरा मैदानावर सुरू असलेल्या जत्रेत अचानक मोठी दुर्घटना घडली. इथल्या फेज-आठ येथील दसरा मैदानात सुरू असलेल्या जत्रेत ड्रॉप टॉवरचा आकाशपाळणा ५० फूट उंचीवरून अचानक खाली पडला. सुमारे २० ते २५ जण या पाळण्यात होते. या सर्वांचा जीव थोडक्यात वाचला. जखमींमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानं या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. हा ड्रॉप टॉवर पाळणा अतिशय वेगानं फिरत होता. अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळं या पाळण्याचा तोल गेला आणि भरधाव वेगात तो खाली पडला. जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश असून, त्यांना घटनेनंतर तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मेळ्याच्या आयोजकांना ४ सप्टेंबरपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी होती, तथापि, मेळ्याची अंतिम मुदत वाढवण्याची माहिती देणारा फलक जागेवर लावण्यात आला होता ज्यानं ११ सप्टेंबरची अंतिम मुदत दिली होती.

हेही वाचा – ट्रेनचं इंजिन थेट शेतात घुसलं..! सोलापूरात घडला अपघात; पाहा VIDEO

घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने आरोप केला, की “त्याचा वैयक्तिक बाऊन्सर जवळपास २० मिनिटे उशिरा आला. या घटनेत एक महिला होती, जिच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
या घटनेत ५० लोक जखमी झाले आहेत. या घटनेची जबाबदारी कोण घेणार? कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय हा व्यवसाय कसा सुरू आहे? सुरक्षेची कोणतीही उपाययोजना का करण्यात आली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं कोणालाही मिळालेली नाहीत.

पोलीस म्हणाले…

डीएसपी हरसिमरन सिंग बल म्हणाले, ”आम्हाला आतापर्यंत जे काही कळले आहे ते म्हणजे त्यांच्याकडे कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी होती. मात्र, त्यांच्याकडून काही चूक झाली तर कुणालाही सोडलं जाणार नाही. कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. आम्ही सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.” मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी असा दावा केला की, मेळा आयोजित करताना कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment