बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक..! सहा जणांना चिरडलं; पाहा धक्कादायक Video

WhatsApp Group

Bus Driver Heart Attack Accident : मध्य प्रदेशात एक दुर्घटना घडली आहे. ही घटना जबलपूरमधील असून ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. चालकाचा मृत्यू झाल्यानंतर बसचे नियंत्रण सुटले आणि सहा प्रवाशांना चिरडले. या संपूर्ण घटनेचे वेदनादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. दामोह नाका परिसरात ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर बस धावली.

जबलपूरच्या दमोह नाका परिसरात मेट्रो बस अनियंत्रित झाल्याने खळबळ उडाली आहे. वाटेत माणसे आणि वाहनांना धडक देत मेट्रो बस रस्त्याच्या कडेला थांबली. सुरुवातीला लोकांना वाटलं की मेट्रो बस ड्रायव्हर मद्यधुंद आहे, पण जेव्हा लोकांना मेट्रो बस ड्रायव्हर बेशुद्धावस्थेत आढळला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. बस चालकाला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा – Video : तिला कळलं नाही आपल्या बाजूला शाहरुख खान बसलाय..! हॉलिवूड नटीची रिअॅक्शन व्हायरल

वास्तविक, बस चालवताना मेट्रो बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मेट्रो बसवरील ताबा सुटला. या अपघातात मेट्रो बस चालकाने ई-रिक्षा, ऑटो रिक्षा आणि दुचाकी चालकांनाही धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेट्रो बस चालकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे कारण साधारणपणे थंडीच्या मोसमात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मेट्रो बस चालकाला सकाळी अशाप्रकारे हृदयविकाराचा झटका येणे ही खरोखरच लोकांसाठी आश्चर्याची बाब आहे. अपघात आणखी वाईट होऊ शकला असता, पण वेळेत मेट्रो बस रस्त्याच्या कडेला थांबली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment