Video : प्लाझ्माऐवजी सलाइनमधून दिला मोसंबी ज्यूस..! पेशंटचा मृत्यू; वाचा!

WhatsApp Group

Patient Died Because Of Mosambi Juice : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका डेंग्यू रुग्णाला प्लाझ्माऐवजी मोसंबी ज्यूस देण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. यूपीच्या बनावट रक्तपेढीचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे एका स्थानिक पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

यासंबंधीचा एक व्हिडिओही ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रयागराजच्या झालवा येथील ग्लोबल हॉस्पिटलची ही घटना असल्याची सांगण्यात आली आहे. येथे दाखल झालेल्या रुग्णाला रक्ताच्या प्लाझ्माऐवजी मोसंबीचा ज्यूस देण्यात आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. १९ ऑक्टोबर रोजी रुग्णाचा मृत्यू झाला. १७ ऑक्टोबर रोजी त्याला तेथे दाखल करण्यात आले.

हेही वाचा – IND Vs PAK मॅचवर ओवेसींचं मत..! म्हणाले, “पाकिस्तानात जायचं नाही, पण…”

या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, घटनेचा तपास सुरू असून लवकरच चाचणी अहवाल अपेक्षित आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. दरम्यान, डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यूपीतील सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यास मनाई केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment