Baba Ramdev Drives Land Rover Defender : योगगुरू आणि पतंजली आयुर्वेदाचे संस्थापक, बाबा रामदेव लीकडेच लँड रोव्हर डिफेंडर एसयूव्ही चालवताना दिसले. याचा एक व्हिडिओही इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यासोबतच लँड रोव्हर डिफेंडर 130 च्या चर्चेलाही वेग आला आहे. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील हरिद्वारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लाल रंगाही एसयूव्ही बाबा रामदेव स्वत: चालवत आहेत आणि त्यांच्यासोबत या कारमध्ये काही लोकही बसले आहेत. या एसयूव्हीवर कोणतीही नोंदणी प्लेट नाही, म्हणजेच ही एक नवीन मॉडेल आहे.
लँड रोव्हर डिफेंडर अनेक अर्थांनी खूप खास आहे. डिफेंडर तीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये येतो, ज्यामध्ये डिफेंडर 90, डिफेंडर 110 आणि डिफेंडर 130 यांचा समावेश आहे. येथे रामदेव जी एसयूव्ही चालवताना दिसत आहेत ती डिफेंडर 130 मॉडेल आहे. कंपनीने ही SUV यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च केली आहे आणि तिची किंमत सुमारे 1.41 कोटी रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
हेही वाचा – Horoscope Today: सिंह आणि तूळ राशीसह ‘या’ ५ राशींना शुभ योगाचे लाभ, वाचा संपूर्ण राशीभविष्य
या SUV मध्ये, कंपनीने 3.0 लिटर क्षमतेचे 6-सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 399.4 Hp पॉवर आणि 550 Nm टॉर्क जनरेट करते. भारतीय बाजारात उपलब्ध असलेली टोयोटा फॉर्च्युनर सुमारे 201hp पॉवर आउटपुट देते यावरून तुम्ही त्याच्या शक्तीचा अंदाज लावू शकता. दोन्ही एसयूव्हीच्या किंमती आणि इंजिन क्षमतेतही खूप फरक आहे.
इंजिन आणि मायलेज
लँड रोव्हर डिफेंडर डिझेल इंजिनसह देखील येतो, ज्यामध्ये 3.0-लिटर, 6-सिलेंडर डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 300 hp पॉवर आणि 600 Nm टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिनची खास गोष्ट म्हणजे ते सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि ते 8-स्पीड गिअरबॉक्सशी जुळलेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोर-व्हील ड्राइव्ह (4WD) सिस्टीमसह सुसज्ज डिफेंडर 14 किमी/ली पर्यंत मायलेज देतो.
योग गुरु बाबा रामदेव का एक वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसमें बाबा रामदेव लैंड रोवर डिफेंडर 130 चलाते हुए नज़र आ रहे हैं. इस कार की कीमत 1.41 करोड़ बताई जा रही है. देखिए वीडियो #BabaRamdev #SUV #LandRoverDefender #Video pic.twitter.com/ZSVBNifkyj
— NEWS DAILY MEDIA (Chitransh Singh) (@News_Chitransh) July 26, 2023
परफॉरमन्स आणि वेग
या एसयूव्हीचा टॉप स्पीड 188 किमी प्रतितास आहे आणि कंपनीचा दावा आहे की ही एसयूव्ही केवळ 8.9 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवण्यास सक्षम आहे. त्याच्या केबिनमध्ये 11.4-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय इंटरएक्टिव्ह ड्रायव्हर डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले, थ्रीडी सराउंड कॅमेरा, मेरिडियन साऊंड सिस्टिम आदी सुविधा उपलब्ध आहेत.
डिफेंडर 130 दोन वेगवेगळ्या सीटर पर्यांयासह येते, 5 सीटर आणि 8 सीटर. याशिवाय, कंपनी या एसयूव्हीसाठी कस्टमायझेशन सुविधा देखील प्रदान करते. ही एसयूव्ही एस, एसई, एचएसई, डायनॅमिक एसई व्हेरियंटमध्ये येते. यामध्ये, कंपनीने एकापेक्षा जास्त उत्कृष्ट वैशिष्ट्यांना स्थान दिले आहे, जे तिच्या ड्रायव्हिंगचा अनुभव सुधारतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!