ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन; सिनेसृष्टीत हळहळ

WhatsApp Group

Actor Sunil Shende Passed Away : ‘गांधी’, ‘सरफरोश’ आणि ‘वास्तव’ यांसारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ मराठी चित्रपट कलाकार सुनील शेंडे यांचे निधन झाले. शेंडे यांनी दुपारी एकच्या सुमारास मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी पारशीवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुनील यांच्या पश्चात पत्नी ज्योती आणि दोन मुले हृषिकेश आणि ओंकार असा परिवार आहे.

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे चित्रपटांमध्ये राजकारणी आणि पोलिसांच्या भूमिकेत अधिक दिसले आहेत. त्यांच्या दमदार आवाजाची सर्वांनाच खात्री होती.  सुनील शेंडे यांनी काथुंग (१९८९), मधुचंद्राची रात (१९८९), जस बाप तसे पोर (१९९१), ईश्वर (१९८९), नरसिंह (१९९१) यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

हेही वाचा – गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे केले, १८ दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि दररोज…!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment