‘बाहुबली’ फेम प्रभासवर दु:खाचा डोंगर..! कुटुंबातील दिग्गज अभिनेत्याचं निधन

WhatsApp Group

UV Krishnam Raju Death : साऊथ सिनेमातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही. कृष्णम राजू यांचे निधन झालं आहे. राजू यांनी रविवारी वयाच्या ८२ व्या वर्षी हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं साऊथ सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

दक्षिणेचे ज्येष्ठ अभिनेते यू.व्ही कृष्णम राजू

यू. व्ही. कृष्णम राजू आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं, की ते कोविड-१९ नंतरच्या समस्यांशी झुंज देत होते. त्यांना ५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या हृदयाचे ठोके अचानक बिघडले. त्यांची किडनीही नीट काम करत नव्हती. राजू रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र रविवारी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

हेही वाचा – बाप रे बाप..! हेअर ड्रायरमधून आग निघताच आख्खं सलून पेटलं; पाहा शॉकिंग VIDEO!

कारकीर्द

यू. व्ही. कृष्णम राजू हे साऊथ सिनेमाचा सुपरस्टार प्रभासचे काका होते. ते स्वतःही एक उत्तम अभिनेते होते. टॉलिवूडमध्ये ते रेबल स्टार म्हणून ओळखले जात होते. मात्र रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी आपल्या करिअरमध्ये १८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साउथ सिनेमात त्यांनी आपल्या बंडखोर पात्रांसह एक ट्रेंड सेट केला, म्हणून त्याला ‘रिबेल स्टार’ देखील म्हटलं गेलं. त्यांनी १९६६ साली ‘चिलाका गोरिंका’ या तेलुगू चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. चित्रपटांतील उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

हेही वाचा – VIDEO : चाहत्यानं केलं असं काही की हृतिक रोशन भडकला..! म्हणाला, “क्या कर रहा रहा है?”

यू. व्ही. कृष्णम राजू अभिनयासोबतच राजकारणाचाही एक भाग होते. ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केलं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment