Varun Dhawan Suffering From Disorder : सध्या वरुण धवन आगामी चित्रपट ‘भेडिया’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, वरुणने खुलासा केला की मागील चित्रपट ‘जुग्जुग जिओ’साठी कठोर परिश्रम केल्यानंतर त्याला एका आजाराचा सामना करावा लागला होता. या आजाराचे नाव ‘व्हेस्टिबुलर हायपोफंक्शन’ आहे. वरुणने सांगितले की, कोविड-१९ महामारीनंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव होता. वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक वेस्टिब्युलर डिसऑर्डर आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची संतुलन प्रणाली योग्यरित्या कार्य करत नाही.
एका कार्यक्रमादरम्यान वरुण धवन म्हणाला, “अलीकडे मी सर्व काही बंद केले आहे. मला काय झालंय हेच कळत नव्हतं. मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाचा आजार झाला होता. यामुळे तुमचे संतुलन बिघडते. पण मी जास्त मेहनत केली… या शर्यतीत आपण नुसतेच धावतोय, पण कुणी विचारत नाही का? मला वाटते की आपण सर्व येथे का आहोत यामागे एक मोठा हेतू आहे. मी माझे शोधण्याचा प्रयत्न करत आहे, आणि मला आशा आहे की तुम्हालाही ते सापडेल.”
हेही वाचा – Video : मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथील दुकानांना भीषण आग; लोकांची पळापळ!
#VarunDhawan reveals being diagnosed with 'Vestibular Hypofunction': I just shut down, pushed myself so hard@Varun_dvn https://t.co/fkuXeyDQN0
— India Forums (@indiaforums) November 5, 2022
वरुण धवनचा ‘भेडिया’ रिलीज होणार आहे. यामध्ये कृती सेनन आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. अलीकडेच वरुणने त्याच्या चाहत्यांना हॅलोविन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी भेडियातील एक नवीन लूक शेअर केला आहे. फोटोमध्ये वरुणचा चित्रपटातील वेअरवॉल्फ लूक पाहायला मिळाला, जो खरोखरच भयानक आहे.