गुंतवणुकीसाठी लै भारी संधी! ‘या’ बँकेचा IPO आज उघडला; लक्षात घ्या गोष्टी!

WhatsApp Group

Utkarsh Small Finance Bank IPO : बऱ्याच दिवसांनी एका बँकेचा आयपीओ उघडण्यात आला आहे. बँक लहान आहे, पण बॅलेन्स शीट मजबूत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank) असे बँकेचे नाव आहे. आज आयपीओ उघडताच लोक त्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओसाठी 12 जुलै ते 14 जुलै या कालावधीत गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. मात्र पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हा आयपीओ दुपटीहून अधिक भरला आहे. गुंतवणुकीसाठी अजून दोन दिवस बाकी असताना कमाल किरकोळ भाग आतापर्यंत 7 वेळा सबस्क्राइब झाला आहे.

आयपीओबद्दल माहिती

या आयपीओ साठी किंमत 23-25 ​​रुपये निश्चित करण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एक लॉटसाठी अर्ज करावा लागेल. एका लॉटमध्ये 600 शेअर्स असून, त्यासाठी किमान 15 हजार रुपये गुंतवावे लागतील. तथापि, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतात. ज्यासाठी 195000 रुपये भरावे लागतील.

या आयपीओ चे वाटप 19 जुलै रोजी होणार आहे. BSE आणि NSE वर स्टॉकची लिस्ट करण्याची तारीख 24 जुलै निश्चित करण्यात आली आहे. बँकेच्या आयपीओ इश्यूपैकी 75 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि 10 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : गौतम गंभीर आता ‘या’ संघाचा कोच? लखनऊ आणणार ‘नवा’ महागुरू?

GMP मध्ये मोठी उडी

या आयपीओ द्वारे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे फक्त नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. या अंतर्गत 20 कोटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. बँकेने आयपीओद्वारे 500 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे

दरम्यान, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सला अनलिस्टेड मार्केटमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये (GMP) वाढ झाली आहे. सध्या त्याची जीएमपी सुमारे 15 रुपये आहे. म्हणजेच हा शेअर जवळपास 60 टक्के प्रीमियमवर व्यवहार करत आहे. गुंतवणूकदारांना सूचीमध्ये चांगली कमाई करण्याची क्षमता आहे. मात्र, गुंतवणूकदारांनी जीएमपीऐवजी बँकेची आर्थिक स्थिती पाहून गुंतवणूक करावी.

बँकेबद्दल..

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 2016 मध्ये उघडण्यात आली. याचे मुख्यालय वाराणसी, उत्तर प्रदेश येथे आहे. बाजारातून उभारलेला पैसा बँक टियर-1 मधील भांडवली पाया सुधारण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment