भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. बायोटेक उद्योजक रामास्वामींनी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 37 वर्षांच्या रामास्वामींचा जन्म ओहायोमध्ये झाला होता. त्यांनी हॉर्वर्ड आणि येल विद्यापीठांमधून शिक्षण घेतले. बायोटेक क्षेत्रात त्यांनी कोट्यवधींची कमाई केली.
रामास्वामी म्हणाले, ”सध्या आम्ही अध्यक्षपदाची ही मोहीम थांबवणार आहोत. मी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला की त्यांच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढे अध्यक्षपदासाठी त्यांना माझा पूर्ण पाठिंबा असेल.”
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि आयोवाच्या रिपब्लिकन कॉकसमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या मतदानात अत्यंत खराब कामगिरीनंतर रामास्वामी यांनी ही घोषणा केली आहे.
हेही वाचा – धारावीत राहणाऱ्या लोकांची मजा, गौतम अदानी देणार मोठे फ्लॅट्स!
रामास्वामी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील होण्याची घोषणा केली होती. तेव्हा तेथील राजकीय वर्तुळात त्यांना फार कमी लोक ओळखत होते. मात्र, इमिग्रेशन आणि अमेरिका-फर्स्ट असे मुद्दे उपस्थित करून त्यांनी रिपब्लिकन मतदारांमध्ये पटकन आपले स्थान निर्माण केले.
रामास्वामी यांचा हा निवडणूक प्रचार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखाच दिसत होता. गेल्या निवडणुकीत ज्या पुराणमतवादी मतदारांनी ट्रम्प यांना यश मिळवून दिले होते, त्यांना रामास्वामी आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात होते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!