अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : गांजा लीगल होणार? लोकांना काय हवंय?

WhatsApp Group

US Election 2024 And Marijuana Legalisation : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. उमेदवार आणि मतदार दोघेही आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्रपती आपापल्या परीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांजा चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही उमेदवारांना अमेरिकेत गांजा लीगल करायचा आहे. पण असे का ते जाणून घेऊ.

अध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबरला मतदान

अमेरिकेत 5 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर जो कोणी राष्ट्राध्यक्ष होईल, तो साहजिकच व्यवस्थेत काही बदल करेल. यातील एक बदल असा असू शकतो की अमेरिकेत गांजा लीगल केला जाईल. खरं तर, अमेरिकेत गेल्या शंभर वर्षांपासून गांजाच्या वापरावर फेडरल बंदी आहे. फक्त वैद्यकीय वापरासाठी गांजाला परवानगी आहे.

असे असूनही, आश्चर्याची गोष्ट म्हणजे 24 अमेरिकन राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया यांनी गांजा लीगल केला आहे. या राज्यांमध्ये, गांजाच्या विक्रीवर अल्कोहोलच्या विक्रीप्रमाणेच नियंत्रण ठेवले जाते आणि त्यावर करही आकारला जातो. यासाठी, गांजाच्या कायदेशीरकरणास समर्थन देणाऱ्या मार्जुआना पॉलिसी प्रकल्पाचा आधार घेतला गेला आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण अमेरिकन लोकसंख्येपैकी 53 टक्के लोक गांजाच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिलेल्या राज्यांमध्ये राहतात.

याशिवाय अमेरिकेत अशी सात राज्ये आहेत ज्यांनी अल्प प्रमाणात गांजा बाळगल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा काढून टाकली आहे. एकूण, 38 यूएस राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये गांजाच्या वैद्यकीय वापरास परवानगी देणारे कायदे आहेत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीच्या एका सर्वेक्षणात सुमारे 70 टक्के अमेरिकन प्रौढांनी याला कायदेशीर मान्यता द्यावी, असे म्हटले होते. 1969 मध्ये जेव्हा गांजा धोरण तयार करण्यात आले तेव्हा झालेल्या सर्वेक्षणापेक्षा गेल्या वर्षी, अधिक प्रौढांनी गांजा लीगल करण्यासाठी मतदान केले. कदाचित त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवार गांजा लीगल करण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

जेव्हा गांजा कायदेशीर करण्याचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस वेगळी भूमिका घेतात. 2019 मध्ये, त्यांनी मारिजुआनाचे फेडरल गुन्हेगारीकरण समाप्त करण्यासाठी सिनेटमध्ये एक विधेयक सादर केले. मात्र, गांजाबद्दलचे त्यांची भूमिका नेहमीच अशी नव्हती. वॉशिंग्टन पोस्टच्या मते, जेव्हा त्या सॅन फ्रान्सिस्को डिस्ट्रिक्ट ॲटर्नी होत्या, तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये सुमारे 2000 लोकांना गांजा-संबंधित गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले होते. 2010 मध्ये, जेव्हा त्या कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल होण्यासाठी प्रयत्न करत होत्या, तेव्हा त्यांनी त्याचा वापर लीगल करण्यास विरोध केला होता.

हेही वाचा – कोकण रेल्वेत नोकरीची संधी! ‘इतक्या’ जागा खाली; पगारही मजबूत! वाचा डिटेल्स

आता त्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी झाल्याने त्यांची भूमिका पुन्हा एकदा बदललेली दिसते. गांजा ओढल्यामुळे कोणीही तुरुंगात जाऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की बरेच लोक गांजा बाळगल्याबद्दल तुरुंगात गेले आहेत.

जोपर्यंत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध आहे, या विषयावर त्यांची भूमिका वेगळी होती आणि ती फारशी स्पष्ट नाही. राष्ट्रपती या नात्याने त्यांनी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अमली पदार्थ विक्रेत्याला माफ केले. त्यानंतर 2023 मध्ये ते म्हणाले की सर्व ड्रग्ज विक्रेत्यांना फाशीची शिक्षा द्यावी. आता अलीकडेच त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की ते फ्लोरिडा बॅलट इनिशिएटिव्हमध्ये गांजा लीगल करण्यासाठी मतदान करणार आहेत. अशा स्थितीत 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानंतर कोणाचाही अध्यक्ष निवडला जाईल, गांजाबाबत त्यांची भूमिका काय असेल, हे पाहणे बाकी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment