

Gautam Adani : न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानीसह 8 जणांवर कोट्यवधींची फसवणूक आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाचे म्हणणे आहे की भारतात सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना $265 मिलियन (सुमारे 2200 कोटी) लाच दिली किंवा देण्याची योजना आखली.
हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अन्य एका फर्मशी संबंधित आहे. हा खटला 24 ऑक्टोबर 2024 रोजी अमेरिकन कोर्टात नोंदवण्यात आला होता, त्यावर बुधवारी सुनावणी झाली. अदानी व्यतिरिक्त, सागर अदानी, विनीत एस जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल यांचा समावेश असलेल्या इतर सात लोकांचा समावेश आहे.
Billionaire Gautam Adani Charged For Alleged $250 Million Bribery Schemehttps://t.co/YJoI5Aa6NX pic.twitter.com/Xjt7hR680B
— Forbes (@Forbes) November 20, 2024
हा लाचेचा पैसा गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलत असल्याचा आरोप आहे. सागर आणि विनीत हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आहेत. सागर हा गौतम अदानी यांचा पुतण्या आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गौतम अदानी आणि सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा – Artificial Rain In Delhi : दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडायचा विचार, कसा पडतो? किती खर्च येतो?
अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा या प्रकल्पात गुंतवला गेल्याने अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आणि अमेरिकन कायद्यानुसार तो पैसा लाच म्हणून देणे गुन्हा आहे.
बुधवारीच, अदानीने 20 वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून $600 मिलियन (रु. 5064 कोटी) उभारण्याची घोषणा केली होती. काही तासांनंतर, त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाला.
बाजार उघडल्यानंतर अदानी समूहाचे सर्व 10 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 20% च्या लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. तर, अदानी ग्रीन एनर्जीचे समभाग 17.32% ने खाली आले आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!