UPSC Prelims Result 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे. UPSC प्रिलिम्समध्ये बसलेले उमेदवार upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. UPSC प्रिलिम्स परीक्षा 28 मे 2023 रोजी झाली. UPSC ने त्यांच्या वेबसाइटवर एक PDF फाइल अपलोड केली आहे ज्यामध्ये प्रिलिम्समध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचे रोल नंबर आणि नावे आहेत.
अशा प्रकारे तपासा UPSC निकाल
- UPSC प्रिलिम्स निकाल पाहण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.inवर जा.
- येथे मुख्यपृष्ठावर, ‘लिखित निकाल – नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2023’ या लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर एक PDF फाइल दिसेल.
- या PDF फाइलमध्ये पात्र उमेदवारांचे रोल नंबर नमूद केले जातील.
- या यादीत तुमचा रोल नंबर शोधा आणि भविष्यातील संदर्भांसाठी PDF फाइल सेव्ह करा.
- UPSSC प्रिलिम्स निकाल 2023 डायरेक्ट लिंक
हेही वाचा – WTC Final 2023 : लंडनच्या मैदानात अजिंक्य रहाणे-शार्दुल ठाकूरची मराठीत बातचीत, Video व्हायरल!
मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये
UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केली जाईल. प्रिलिम्समध्ये पात्र ठरलेले उमेदवार या परीक्षेला बसतील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!