UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात, परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : कोणत्या प्राण्यांना मासिक पाळी येते?
उत्तर : माणसांशिवाय चिंपांझी, वटवाघुळ, हत्ती, मांजर यांना पाळी येते.
प्रश्न : जिल्हा गॅझेटियर म्हणजे काय?
उत्तर : ब्रिटीशांच्या काळात दरवर्षी ते तयार केले जायचे, त्यात संपूर्ण जिल्ह्याच्या नोंदी ठेवल्या जायच्या.
प्रश्न : सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात?
उत्तरः सात रंग.
प्रश्न : जर एखाद्या मुलाने मुलीला प्रपोज केले तर ते गुन्ह्याच्या कक्षेत येईल का?
उत्तर : नाही कारण आयपीसीच्या कोणत्याही कलमात प्रपोज करणे गुन्हा म्हणून वर्गीकृत केलेले नाही.
हेही वाचा – हॅट्स ऑफ..! नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’; दुसरा नंबर ‘या’ जिल्ह्याचा!
प्रश्न : एका माणसाच्या डोळ्याचे वजन?
उत्तर : एका डोळ्याचे वजन फक्त आठ ग्रॅम आहे.
प्रश्न : असा कोणता प्राणी आहे, ज्याचे डोके कापले गेले तर तो अनेक दिवस जिवंत राहू शकतो?
उत्तर : झुरळ.
प्रश्न : भारतातील सर्वात महाग शहर कोणते आहे?
उत्तर : मुंबई.
प्रश्न : पेट्रोल पंपावर कोणते कपडे घालू नयेत?
उत्तर : सिंथेटिक.
प्रश्न : रेल्वेमध्ये W/L बोर्डाचा अर्थ काय आहे?
उत्तर : जेथे W/L चे बोर्ड लावले आहेत, तेथे ड्रायव्हरला हॉर्न वाजवावा लागतो.
प्रश्न : सावली नसलेल्या वस्तूचे नाव सांगा?
उत्तर : रस्ता.
प्रश्न : समुद्रात आणि तुमच्या घरात असणारी गोष्ट कोणती?
उत्तर : मीठ.