UPSC Civil Services Final Result 2023 : यूपीएससीचा निकाल जाहीर! आदित्य श्रीवास्तव देशात अव्वल

WhatsApp Group

UPSC Civil Services Final Result 2023 : यूपीएससी मेन्स 2023 चा अंतिम निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. हा निकाल 2 जानेवारी 2024 ते 9 एप्रिल 2024 पर्यंत चाललेल्या मुलाखत प्रक्रियेनंतर निश्चित करण्यात आला आहे. त्याचा निकाल आजच येण्याची शक्यता होती. हा निकाल आयोगाने 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला. सर्व उमेदवार ज्यांनी मुख्य परीक्षा दिली होती आणि त्यानंतर मुलाखत दिली होती ते आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.

आदित्य श्रीवास्तव अव्वल

UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 च्या निकालात आदित्य श्रीवास्त अव्वल ठरला आहे. त्याला संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळाला आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये एकूण 1016 उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये आदित्य श्रीवास्तव टॉपर ठरला आहे. अनिमेष प्रधानला दुसरा तर अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या तर रुहानी पाचव्या स्थानावर आहे.

जनरल कॅटेगरीतून 347 निवडले

निवड झालेल्या 1016 उमेदवारांपैकी 347 सामान्य श्रेणीतील आहेत. 115 EWS वर्गातील आहेत तर 303 OBC उमेदवार आहेत. 165 SC आणि 86 ST उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा, गट A आणि B मध्ये नियुक्तीसाठी लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणीच्या आधारे अंतिम निकाल तयार करण्यात आले आहेत.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतोय ॲग्री इन्फ्रा फंड; गेल्या चार वर्षांत मोठा फायदा!

याप्रमाणे निकाल तपासा

  • UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल पाहण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
  • नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम निकालाची लिंक होम पेजवरच फ्लॅश होईल.
  • त्यावर क्लिप करा. यानंतर नवीन स्क्रीनवर एक PDF फाईल उघडेल. त्याच PDF मध्ये तुम्हाला तुमचे नाव आणि रोल नंबर तपासावा लागेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी PDF फाईल डाउनलोड करा.
  • UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल पाहण्यासाठी थेट लिंक

UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली होती आणि अर्ज प्रक्रिया 21 फेब्रुवारीपर्यंत चालू होती. यानंतर 28 मे रोजी पूर्वपरीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला. प्रिलिम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी 15 ते 24 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या मुख्य परीक्षेसाठी हजेरी लावली आणि 8 डिसेंबर 2023 रोजी निकाल जाहीर झाला. यानंतर, तेथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 2 जानेवारी 2024 ते 9 एप्रिल 2024 पर्यंत चाललेल्या मुलाखत प्रक्रियेचा भाग बनले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment