Bank FD : निश्चित कालावधीनंतर बंपर व्याजासह चांगली कमाई करण्यासाठी भारतीय ग्राहक अजूनही मुदत ठेवींवर (एफडी) सर्वाधिक अवलंबून असतात. गेल्या काही वर्षांत बँकांनी मुदत ठेवींवर जास्त व्याज देण्यास सुरुवात केली आहे. अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) त्यांच्या ग्राहकांना 8.60 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. तुमची बचत बँकेत 3 वर्षांसाठी गुंतवून चांगला नफा कमावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला अशा बँकांबद्दल जाणून घेऊया ज्या त्यांच्या ग्राहकांना 3 वर्षांच्या एफडी वर जास्तीत जास्त 8.60% पर्यंत व्याज देत आहेत.
SBM बँक
तुम्हाला तुमची बचत 3 वर्षांसाठी एफडी मध्ये गुंतवायची असेल, तर एसबीएम बँक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. एसबीएम बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांसाठी एफडी वर 8.10% व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्याच कालावधीसाठी 8.60% व्याज देत आहे.
DCB बँक
डीसीबी बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या एफडी वर 8% व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्याच कालावधीसाठी 8.50% पर्यंत व्याज देत आहे.
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, वाचा एका तोळ्याची किंमत!
येस बँक
जर तुम्ही सामान्य ग्राहक असाल आणि तुमची बचत येस बँकेत 3 वर्षांच्या एफडी साठी गुंतवली तर तुम्हाला 7.75% व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना या बँकेत 3 वर्षांसाठी एफडी वर 8.25% व्याज मिळेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा