“आधी 10 हजार द्या मग वाचवतो”, पैसे ट्रान्स्फर होईपर्यंत गंगेत वाहून गेला अधिकारी!

WhatsApp Group

UP Officer Drowned In Ganga : कधीकधी काही गोष्टी मानवतेला काळीमा फासणाऱ्या असतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. यूपी आरोग्य विभागाचे उपसंचालक आदित्य वर्धन सिंग (45) उन्नावमधील गंगा घाटावर आंघोळीसाठी गेले होते, परंतु नदीच्या जोरदार प्रवाहात अडकले आणि वाहू लागले. त्यांच्यासोबत आलेल्या मित्रांनी तेथे उपस्थित खासगी गोताखोरांना मदतीचे आवाहन केले मात्र त्यांना आधी 10 हजार रुपये द्या मग बघू असे सांगण्यात आले. तो व्यवहार पूर्ण होईपर्यंत आदित्य वर्धन सिंह गंगेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. दोन दिवसांपासून नदीत शोधमोहीम सुरू आहे.

एका वृत्तानुसार, शनिवारी दुपारी ही घटना घडली जेव्हा आदित्य वर्धन सिंह त्यांच्या मित्रांसोबत उन्नावमधील बिल्हौरमधील नानामऊ घाटावर आंघोळीसाठी आले होते. आदित्य यांना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना फोटो काढायचे होते, म्हणून तो धोक्याचे चिन्ह ओलांडून खोल पाण्यात गेले. त्याला पोहणे माहीत होते पण नदीच्या जोरदार प्रवाहात त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते वाहू लागले. मित्रांनी तिथे उभ्या असलेल्या खासगी डायव्हर्सकडे मदत मागितली पण त्यांना आधी 10 हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. त्याने रोख रक्कम नसल्याचे सांगितल्यावर त्याच्याकडे ऑनलाइन पैसे भरण्याची मागणी करण्यात आली. पैसे ट्रान्सफर होईपर्यंत आदित्य वाहून गेले.

हेही वाचा – SEBI च्या अध्यक्ष एक-दोन नाही, तर तीन ठिकाणांहून घेतात पगार?

आदित्य लखनऊमधील इंदिरा नगरमध्ये राहत होते. या संदर्भात बिल्हौरचे एसीपी अजय कुमार त्रिवेदी यांनीसांगितले की, आदित्यचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे, परंतु अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. एसडीआरएफ, फ्लड युनिट, पोलीस आणि खासगी गोताखोर शोधकार्यात गुंतले आहेत. खासगी गोताखोरांनी पैशांची मागणी केल्याच्या प्रश्नावर, डीसीपी पश्चिम राजेश कुमार सिंह यांनी टाइम्सला सांगितले की या प्रकरणात गोताखोरांचे म्हणणे आहे की त्यांनी त्यांच्या स्टीमरमध्ये इंधन टाकण्यासाठी पैशाची मागणी केली होती. मात्र, त्यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास आरोपी गोताखोरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment