Uttar Pradesh Govt To Farmers : उत्तर प्रदेशात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. या भागात आता नैसर्गिक शेती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाच्या स्थापनेनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना गुरांच्या संगोपनासाठी आर्थिक अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असा योगी सरकारचा विश्वास आहे. आज तकने यासंबंधी वृत्त दिले आहे.
शेतकऱ्यांना मोफत गाय
सरकारने सहभाग योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देशी गायी देण्याबरोबरच भटक्या गुरांच्या संगोपनासाठी महिन्याला ९०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे देशी गाय नाही, त्यांना सरकारकडून देशी गाय मोफत दिली जाणार आहे. या गायीच्या सहाय्याने शेतकरी आपली नैसर्गिक शेती आणखी सुधारू शकतात आणि चांगला नफा मिळवू शकतात. पशुसंवर्धन विभागानुसार, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी ६,२०० गोशाळांमधून प्रत्येकी एक देशी गाय दिली जाईल. त्यासाठी गोशाळांना सूचनाही दिल्या आहेत.
हेही वाचा – Aadhar Pan Link : आधार-पॅन लिंक नसेल तर ‘या’ दिवशी होणार बंद..! ‘असं’ करा लिंक
बचत गटही गायीवर आधारित करतील शेती
सरकारच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत नोंदणी केलेले स्वयं-सहायता गट देखील गायीवर आधारित शेती करू शकतात. यासाठी ग्रामविकास विभागाकडून क्लस्टर तयार करून त्यांचे शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. या कामासाठी नाबार्डचीही मदत घेतली जाणार आहे. यासोबतच सरकारकडून गंगा काठावर नैसर्गिक शेतीलाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदतही देण्यात आली आहे.