UP Youth Chops Ex-Girlfriend’s Body Into 6 Pieces : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आझमगडमधील आहे. १५ नोव्हेंबर रोजी येथे एका मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा अनेक मोठे खुलासे होऊ लागले. या मुलीची तिच्या माजी प्रियकराने हत्या करून नंतर मृतदेहाचे तुकडे करून विहिरीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे. खून प्रकरणातील आरोपी राजकुमार यादव याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्रिन्सला त्याची माजी प्रेयसी आराधनाने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याचा राग होता, म्हणून त्याने तिची हत्या केली. मोठी गोष्ट म्हणजे त्याचे आई-वडील, बहीण, मामा, आणि त्याची पत्नी यांचाही या कटात सहभाग होता. १५ नोव्हेंबर रोजी पश्चिमेकडील गावाच्या सीमेवर असलेल्या विहिरीत काही स्थानिकांना कुजलेला मृतदेह आढळून आल्याने पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
मछली काटने के औजार से प्रिंस यादव ने अपनी प्रेमिका को आधा दर्जन टुकड़ों में काट कर अलग अलग स्थानों पर फेक दिया था,उसकी प्रेमिका का दोष सिर्फ इतना था कि उसने शादी कर ली किसी और से,फिलहाल पुलिस ने प्रिंस को गिरफ्तार कर लिया है और सारे सवालों से पर्दा हटा दिया है #Azamgarh pic.twitter.com/x6lMFfs4MF
— Avneesh Upadhyay (@avneeshofficial) November 20, 2022
Azamgarh Police arrested the accused Prince Yadav who had allegedly murdered Aradhana Prajapati & threw her chopped body of the woman in a well. The head was found in a pond. pic.twitter.com/p9EH1YdAag https://t.co/I3P0lT92D1
— Mohammed Zubair (@zoo_bear) November 20, 2022
हेही वाचा – मुकेश अंबानी झाले जुळ्या मुलांचे आजोबा..! ‘अशी’ आहेत दोघांची नावं
Accused Prince Yadav who had allegedly murdered Aradhana Prajapati (22) & threw her mutilated body without clothes in well, was nabbed after a police encounter with #Azamgarh police.#UttarPradesh https://t.co/Ibzj6gx5md pic.twitter.com/DEYfQObWkn
— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) November 20, 2022
९ नोव्हेंबर रोजी आराधनाची हत्या
आझमगडचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले होते की, आराधना नावाच्या पीडितेचा मृतदेह विहिरीत सापडला होता, जो दोन ते तीन दिवस जुना दिसत होता. आरोपी प्रिन्स ९ नोव्हेंबर रोजी आराधनाला बाईकवरून मंदिरात घेऊन गेला होता. तेथे पोहोचल्यावर त्याने सर्वेशच्या मदतीने उसाच्या शेतात तिचा गळा आवळून खून केला. त्याच्या शरीराचे सहा तुकडे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतदेहाचे तुकडे करून पॉलिथीन पिशवीत गुंडाळून विहिरीत टाकून डोक्याचा भाग काही अंतरावर असलेल्या तलावात फेकून दिला. पोलिसांनी आरोपी राजकुमार यादव याला १९ नोव्हेंबरच्या रात्री अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी नेले जात असताना त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात प्रिन्स जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली दांडी, लाकडी बाटली, पिस्तूल, काडतुसे आणि इतर साहित्य जप्त केले आहे.