Father Put His Son On Sale : उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या जिल्ह्यातील रोडवेज बस स्टँड चौकात एका बापाने आपल्या पोरालाच विकायला काढले. कर्जबाजारीपणामुळे हा बाप आपल्या मुलाला 6 ते 8 लाख रुपयांना विकण्यास तयार झाला आहे. आपल्या कुटुंबासह फुटपाथवर बसून ही व्यक्ती गळ्यात “माझा मुलगा विक्रीसाठी आहे, मला माझा मुलगा विकायचा आहे” असा फलक लावून बसला असल्याचे व्हिडिओत समजते.
या व्यक्तीचे नाव राजकुमार असून त्याने काही मालमत्ता खरेदी करण्यासाठी लोकांकडून कर्ज घेतले होते, परंतु हेराफेरी करून राजकुमारला कर्जदार बनवले गेले आणि त्याचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मालमत्तेची कागदपत्रे बँकेत ठेवून त्याला कर्ज मिळाले. राजकुमारचा आरोप आहे की, त्याला ना मालमत्ता मिळाली ना त्याच्या हातात पैसे राहिले आहेत. आता संबंधित माणसे त्याच्यावर पैसे वसूल करण्यासाठी सतत दबाव टाकत आहे. राजकुमार कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ई-रिक्षा चालवतो, पण ही रिक्षाही हिसकावून घेण्यात आल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा – भारतीय संघ वर्ल्डकप जिंकणार का? महेंद्रसिंह धोनीने दिलेले उत्तर वाचा!
”मी आता इतका अस्वस्थ झालो आहे की, मी माझा मुलगा विकण्यासाठी पत्नी, मुलगा आणि तरुण मुलीसोबत बस स्टँड चौकात येऊन बसलो आहे. माझी इच्छा आहे की जर कोणी माझ्या मुलाला 6 ते 8 लाख रुपयांना विकत घेतले तर मी माझ्या मुलीला तरी शिकवू शकेन. मी तिचे लग्न करून देईल आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेईन. मी स्थानिक पोलिसांकडे गेलो होतो, पण तिथून मदत मिळाली नाही, त्यामुळे आता हे पाऊल उचलावे लागले”, असे राजकुमारने सांगितले.
हा सर्व प्रकार पाहून घटनास्थळी जाणाऱ्यांची गर्दी होऊ लागली. त्याच गर्दीत उपस्थित असलेल्या एका महिलेने राजकुमार आणि त्याची पत्नी आणि मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तासाभरानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून राजकुमारला कुटुंबासह ताब्यात घेतले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!