Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज, रविवारी (10 सप्टेंबर) पत्नी अक्षता मूर्तीसह दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. सुनक दोन दिवसीय G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आहेत, जिथे जागतिक नेते जगातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आपल्या हिंदू मुळांचा अभिमान व्यक्त करत, ऋषी सुनक यांनी काल आशा व्यक्त केली की त्यांना भारतातील मंदिराला भेट देण्यासाठी वेळ मिळेल.
ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता दिल्लीतील त्यांच्या काही आवडत्या रेस्टॉरंटला भेट देण्याची योजना आखत आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ते ते नेहमी जायचे. सुनक म्हणाले, ”मला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे. G20 ला मोठ्या प्रमाणात यश मिळवून देण्यासाठी मी उत्सुक आहेत.” G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी काल सुनक यांची भेट घेतली आणि व्यापार संबंध मजबूत करण्याच्या आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
हेही वाचा – Viral Video : भयानक घटना होण्यापूर्वीचे CCTV फुटेज, 2000 लोकांचा मृत्यू!
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सुनक म्हणाले, ”मला हिंदू असण्याचा अभिमान आहे. मी असाच वाढलो, मी असाच आहे. पुढील काही दिवस इथे राहिल्यावर मला मंदिराला भेट देता येईल अशी आशा आहे. आमच्याकडे नुकतेच रक्षाबंधन साजरे झाले, त्यामुळे माझ्याकडे माझ्या बहिणीच्या राख्या आहेत… जन्माष्टमी साजरी करायला माझ्याकडे वेळ नव्हता. पण मी म्हटल्याप्रमाणे, जर आपण यावेळी मंदिरात गेलो तर मी त्याची भरपाई करू शकेन.”
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!