भारीच! सुधा मूर्तींच्या जावयानं इंग्लंडमध्ये साजरी केली जन्माष्टमी; होऊ शकतात ब्रिटनचे पंतप्रधान!

WhatsApp Group

Rishi Sunak Celebrate Janmashtami : ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती गुरुवारी श्रीकृष्णाच्या मंदिरात पोहोचले. त्यांनी दर्शन घेतले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या. सुनक यांनी सोशल मीडियावर लिहिले, ”मी पत्नीसोबत भक्तीवेदांत मनोर मंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यासाठी गेलो होतो. हा हिंदूंचा लोकप्रिय सण आहे. तो आपण मोठ्या थाटामाटात साजरा करतो.” सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. जर ते निवडणूक जिंकले तर ते ब्रिटनचे पंतप्रधान होणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती असतील.

सुनक यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. अक्षता यांच्यासोबत त्यांची पहिली भेट इथंच झाली. २००९ मध्ये बंगळुरूमध्ये त्यांचं लग्न झालं. सुनक साउथॅम्प्टनमध्ये राहतात. त्यांचे पालक भारतातील पंजाब राज्यातील रहिवासी होते. ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते. अक्षता या भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहे.

हेही वाचा – ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा करते काय?

हेही  वाचा – IND Vs ZIM : राष्ट्रगीतादरम्यान ईशान किशनच्या कानात जात होती मधमाशी..! पुढं काय झालं? पाहा VIDEO

अक्षता यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व नाही. ब्रिटीश कायद्यानुसार, त्यांना यूके बाहेरून त्यांच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागत नाही. हा कर फक्त ब्रिटिश नागरिकांनाच भरावा लागतो. सुनक यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी ब्रिटनमधील नागरिकांवर कराचा बोजा वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

सुनक हे २०१५ मध्ये पहिल्यांदा खासदार

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी चीनबाबत कठोर भूमिका मांडली होती. सुनक म्हणाले, ”हे पूर्णपणे स्पष्ट झालं आहे, की चीन हा आपल्या देशासाठी आणि जगासाठी सर्वात मोठा धोका आहे. मी पंतप्रधान झालो तर पहिल्या दिवसापासून चीनवर कडक कारवाई करेन.” ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा ५ सप्टेंबरला होणार आहे. सुनक यांच्याशिवाय लिझ ट्रस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. पहिल्या शर्यतीत ८ उमेदवार होते. खासदारांच्या मतदानाच्या पाच फेऱ्यांनंतर ही दोनच नावं उरली आहेत. २०१५ मध्ये सुनक पहिल्यांदा खासदार झाले आणि २०१९ मध्ये त्यांना अर्थमंत्री करण्यात आले.

यूकेमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक दोन टप्प्यात

ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याची निवडणूक दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात पक्षाचे खासदार मतदान करतात. दोन उमेदवार शिल्लक होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू असते. यावेळी पाच टप्प्यात मतदान झाले. विशेष म्हणजे या पाचही टप्प्यात सुनक हे खासदारांची पहिली पसंती होते. आता हा टप्पा पूर्ण झाला आहे. दोन्ही उमेदवार देशभर सभा घेऊन पक्षाच्या सदस्यांकडे मतांची मागणी करत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment