Twitter वर ब्लू टिकसाठी द्यावे लागतील ‘इतके’ पैसे..! प्रत्येक महिन्याला करा खर्च

WhatsApp Group

Twitter Blue Tick Charges : एलोन मस्क ट्विटरचे प्रमुख बनल्यानंतर ट्विटरमध्ये मोठे बदल होत आहेत. ट्विटरवरून अनेक बड्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मस्क यांना उर्वरित ट्विटर कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देत पेड व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मस्क यांचे म्हणणे आहे की, जर अधिकाऱ्यांनी त्यांची मुदत पूर्ण केली नाही तर त्यांना काढून टाकले जाईल.

ब्लू टिकसाठी किती पैसे?

ट्विटर अधिकार्‍यांच्या मते, कंपनी सध्या नवीन ब्लू सबस्क्रिप्शनसाठी प्रति महिना २० डॉलर्स आकारणार आहे. सध्या, वापरकर्त्यांना ट्विटरवरून पडताळणी केल्यानंतर ९० दिवसांच्या आत सबस्क्रिप्शन मॉडेलवर यावे लागेल अन्यथा त्यांचे ब्लू टिक काढून टाकले जाईल. हे काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ब्लू टिकसाठी २० डॉलर्स आकारण्याचा नियम भारतासारख्या देशांमध्ये लागू करण्यात आला असला तरी, याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. एका रिपोर्टनुसार, ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. मात्र, या वृत्तांवर ट्विटरच्या प्रवक्त्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा – Video : मोठी बातमी..! गुजरातमध्ये केबल ब्रिज कोसळला; ४०० जण पाण्यात!

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सुमारे एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. याला ट्विटरची प्रीमियम सेवा म्हणतात. या सेवेमध्ये, वापरकर्त्यांना काही अतिरिक्त फीचर ऑफर करण्यात आली आहेत, जी सामान्य ट्विटर वापरकर्त्यांसाठी लॉक केलेली आहेत. यामध्ये विविध होम कलर स्क्रीन आयकॉन्सचाही समावेश आहे. खरं तर, ट्विटरला ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन आणि पेड व्हेरिफिकेशनद्वारे आपला महसूल वाढवायचा आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ट्विटरवरून जाहिराती सुरू करण्यात आल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment