अभिनेते रितुराज सिंह यांचे निधन, अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम

WhatsApp Group

TV Actor Rituraj Singh Dies : टीव्ही ते ओटीटीपर्यंत आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते रितुराज सिंह यांचे निधन झालं आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रितुराज सिंह लोकप्रिय टीव्ही शो अनुपमामध्ये दिसले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

हा अभिनेता अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा एक भाग होता आणि त्याने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयावर राज्य केले. रितुराज सिंह यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून केवळ इंडस्ट्रीतील लोकच नाही तर चाहतेही दु:खी झाले आहेत.

19 फेब्रुवारीला रितुराज यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते बराच काळ आजारी होते. त्यांना गॅस्ट्रिकचा त्रास होत होता. त्यांचे चांगले मित्र अमित बेहान यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा – मनोज तिवारीचं करियर धोनीनं संपवलं? म्हणाला, “…मला संघातून का काढलं”

रितुराज सिंह ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’ आणि ‘अदालत’, ‘दिया और बाती हम’ यासह अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग होते. या शोमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. रितुराज यांनीआतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात ‘राजनीती’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment