

Indian Railways : जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क असल्याने, भारतीय रेल्वे दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करते. भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा देते. तुम्हाला माहीत नसेल, रेल्वे प्रवाशांकडून प्रवास खर्चाच्या केवळ 50 टक्के रक्कम घेते. यानंतरही रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंगमध्ये अनेक सवलत देते. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही रेल्वेने दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊ शकता.
मार्च 2020 मध्ये, रेल्वेने लोकांना अनावश्यक प्रवास करण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या तिकिट श्रेणींमध्ये दिलेली सूट रद्द केली होती. मात्र रेल्वेने ते पुन्हा सुरू केले असून विद्यार्थ्याला 11 श्रेणींमध्ये सूट देण्यात आली आहे. कोणते विद्यार्थी या सवलतीचा लाभ घेऊ शकतात ते जाणून घ्या.
विद्यार्थी सवलत
भारतीय रेल्वे विद्यार्थ्यांना स्लीपर क्लासमध्ये सवलत देते. IRCTC द्वारे तिकीट भाड्याचा परतावा दुसऱ्या दिवशी परत केला जातो. ते डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. लक्षात घ्या की ही सवलत ई-तिकिटांसाठी वैध नाही.
किती सूट
जनरल कॅटगरीतील विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी आणि स्लीपर क्लासमध्ये 50 टक्के सवलत दिली जाते आणि MST (मासिक हंगामी तिकीट) आणि QST (त्रिमासिक हंगामी तिकीट) मध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. SC/ST श्रेणीतील विद्यार्थ्यांना द्वितीय आणि स्लीपर वर्गात 75 टक्के सवलत आणि MST आणि QST मध्ये 75 टक्के सवलत मिळते.
हेही वाचा – Indian Raillways : ‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये ‘मोठा’ बदल..! आता प्रवास होणार खूप सुखाचा; वाचा!
या परीक्षांवर सूट
UPSC आणि केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाच्या मुख्य परीक्षेत (SSC परीक्षा) बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय श्रेणीत 50 टक्के सवलत आहे. याशिवाय, संशोधन कार्यासाठी प्रवास करणाऱ्या 35 वर्षांखालील संशोधन अभ्यासकांना द्वितीय आणि स्लीपर श्रेणीच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत दिली जाते.
परदेशी विद्यार्थ्यांनाही सूट
सरकारी सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना द्वितीय आणि स्लीपर क्लासच्या प्रवासावर 50 टक्के सवलत मिळते. तसेच, परदेशी विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्ये भारतातील ऐतिहासिक ठिकाणी प्रवास करण्यासाठी द्वितीय आणि स्लीपर क्लासमध्ये 50 टक्के सवलत मिळते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!