Toyota Innova Hycross Price : टॉयोटाने भारतात आपली नवीन कार इनोव्हा हायक्रॉस (Innova HyCross) लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार नोव्हेंबरमध्ये सादर केली होती आणि आता त्याची किंमत जाहीर केली आहे. कंपनीने इनोव्हा हायक्रॉसची सुरुवातीची किंमत १८.३० लाख रुपये ठेवली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत २८.९७ लाख रुपये (एक्स-शोरूम) वाढवण्यात आली आहे. कारचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. ग्राहक हे ५० हजार रुपयांमध्ये बुक करू शकतात. इनोव्हा क्रिस्टासोबत त्याची विक्री केली जाईल.
ही गाडी दोन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये आणली आहे. पेट्रोल आणि पेट्रोल + हायब्रिड. पेट्रोल इंजिन G आणि GX ट्रिममध्ये उपलब्ध आहे. सेल्फ-चार्जिंग हायब्रिड व्हर्जन ZX(O), ZX आणि VX या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. निवडण्यासाठी ७ आणि ८ सीटर पर्याय देखील असतील. खाली इनोव्हाची किंमत देण्यात आली आहे.
- इनोव्हा हायक्रॉस G (७ सीटर) – रु. १८,३०,००० रु
- इनोव्हा हायक्रॉस GX (८ सीटर) – रु. १८,३५,००० रु
- इनोव्हा हायक्रॉस GX (७ सीटर) – १९,१५,००० रु
- इनोव्हा हायक्रॉस GX (८ सीटर) – १९,२०,००० रु
- इनोव्हा हायक्रॉस VX (७ सीटर) – २४,०१,००० रु
- इनोव्हा हायक्रॉस VX (८ सीटर) – २४,०६,००० रु
- इनोव्हा हायक्रॉस ZX (७ सीटर) – २८,३३,००० रु
- इनोव्हा हायक्रॉस ZX(O) (८ सीटर) – २८,९७,००० रु
हेही वाचा – Alert : ३१ डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा, नाहीतर बसेल १०,००० रुपयांचा फटका! तुम्ही केलंय का?
Toyota Innova Hycross prices out!
G-SLF (7 seater) — Rs 18.3 lakh
G-SLF (8 seater) — Rs 18.35 lakh
GX (7S) — Rs 19.15 lakh
GX (8S) — Rs 19.20 lakhHybrid VX (7S) — Rs 24.01 lakh
Hybrid VX (8S) — Rs 24.06 lakh
Hybrid ZX — Rs 28.33 lakh
Hybrid ZX (O) — Rs 28.97 lakh pic.twitter.com/N3DSurtSWQ— Sirish Chandran (@SirishChandran) December 28, 2022
SUV सारखे डिझाइन
विशेष बाब म्हणजे नवीन इनोव्हा हायक्रॉसची रचना एसयूव्हीपासून प्रेरित आहे. यात क्रोमसह हेक्सागोनल ग्रिल, फॉर्च्युनरसारखे मोठे हेडलॅम्प, हॉरिजॉन्टल डेटाइम रनिंग लॅम्प, बॉडी क्लॅडिंग सर्वत्र आहे. बाजूंना १८-इंच अलॉय व्हील आणि क्रिस्टासारखे मोठे ग्लासहाऊस मिळते. मागील बाजूस रूफ माउंटेड स्पॉयलर, एलईडी टेललाइट्स, स्कूप-आउट नंबर प्लेट हाउसिंग आणि ब्लॅक-आउट रिअर बंपर मिळतात
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस इंटिरियर
या गाडीचे इंटिरियर पूर्णपणे नवीन आहे. हायक्रॉसमध्ये १०.१ इंच फ्लोटिंग टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, डॅशबोर्ड-माउंटेड गियर लीव्हर कन्सोल, ७-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि ३६०-डिग्री कॅमेरा आहे. याशिवाय पॅनोरॅमिक सनरूफ, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, व्हेंटिलेटेड सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि ADAS सारखी वैशिष्ट्ये तुमच्याकडे आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!