Toyota Innova Price Hiked : टोयोटाने 2023 मध्ये दुसऱ्यांदा त्यांच्या हायब्रिड MPV इनोव्हा हायक्रॉस MPV च्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने यामागे कोणतेही स्पष्ट कारण दिले नसले तरी कच्च्या मालाची किंमत आणि पुरवठा साखळीतील समस्यांमुळे कंपनीने किमती वाढवल्याचे मानले जात आहे. माहितीनुसार, आता तुम्हाला इनोव्हा हायक्रॉस खरेदी करण्यासाठी 27 हजार रुपये जास्त द्यावे लागतील.
विशेष म्हणजे, ऑर्डर वाढल्यामुळे प्रतीक्षा कालावधी वाढत असल्याने कंपनीने काही काळासाठी इनोव्हाच्या काही व्हेरिएंटचे बुकिंगही बंद केले होते. त्याचवेळी, याआधी मार्चमध्ये कंपनीने इनोव्हाच्या किमतीही वाढवल्या होत्या.
Toyota Innova HyCross revealed for India. Bookings start today, deliveries commence from mid-Jan 2023. Price will be announced later. To be offered in 2 petrol & 3 hybrid variants. Hybrid to offer 21.1 km/l. 0-100 km/hr in 9.5 seconds. Innova Crysta diesel to be sold alongside. pic.twitter.com/Yk0j1CK7Cs
— AARIZ RIZVI (@AarizRizvi) November 25, 2022
आताची किंमत
इनोव्हा हायक्रॉसच्या VX प्रकारासाठी, तुम्हाला आता एक्स-शोरूम रु. 25.03 लाख द्यावे लागतील. त्याच वेळी, त्याच्या G प्रकारासाठी, आता 18.55 लाख रुपये द्यावे लागतील. इनोव्हाचा हा बेस व्हेरिएंट आहे. त्याच वेळी, हायब्रिड इंजिनच्या Z X O च्या टॉप व्हेरिएंटसाठी आता 29.99 लाख रुपये एक्स-शोरूम भरावे लागतील.
हेही वाचा – IPL 2023 : शुबमन गिलने मुंबई इंडियन्सला रडवलं..! चेन्नई-गुजरात खेळणार फायनल
इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल इंजिनसह देण्यात आली होती. MPV मध्ये कंपनीने 2.0 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 172 Bhp पॉवर आणि 205 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय आहेत. ऑटो गियर शिफ्टमध्ये कंपनीने CVT गिअरबॉक्स दिला आहे. दुसरीकडे, जर आपण हायब्रिडबद्दल बोललो तर कंपनीने या इंजिनसह मोटर जोडली आहे. दोन्हीची एकत्रित ऊर्जा 184.8 Bhp पॉवर निर्माण करते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!