Toyota Car Recalls : : टोयोटाने ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान उत्पादित Hyrider आणि Glanza ची युनिट्स परत मागवली आहेत. या मॉडेल्सच्या १३९० युनिट्समध्ये दोष असू शकतो, ज्यामध्ये त्वरित सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यांचा एअरबॅग असेंब्ली कंट्रोलर सदोष असू शकतो. या स्थितीत अपघात झाल्यास एअरबॅग उघडत नाहीत. तथापि, आतापर्यंत अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही ज्यामध्ये या मॉडेल्सच्या एअरबॅग तैनात केल्या गेल्या नाहीत. पण, खबरदारी म्हणून टोयोटाने वाहने परत मागवली आहेत.
तपासणीनंतर कोणताही भाग सदोष आढळल्यास, तो मोफत बदलला जाईल, संभाव्य दोषपूर्ण भाग थेट प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने, कार निर्मात्याने परत मागवलेल्या कारच्या मालकांना (ग्लॅन्झा आणि हायराइडर) चौकशी होईपर्यंत त्यांच्या गाड्या जपून वापरण्याची विनंती केली आहे. यासाठी संबंधित टोयोटा डीलर खरेदीदाराशी संपर्क साधेल किंवा ग्राहक स्वतः डीलरशी संपर्क साधू शकतो.
हेही वाचा – १३८ करोड लोकांसाठी खुशखबर..! ‘हे’ खाद्यतेल झालं स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट!
एअरबॅग उघडत नाही, जीवाला धोका
अपघाताच्या वेळी कारमध्ये असलेल्या एअरबॅग्ज उघडल्या नाहीत तर त्यात बसलेल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अपघात झाल्यास प्रवाशांचे प्राण वाचवण्यात एअरबॅग्ज महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच, कोणत्याही कारमध्ये किमान २ एअरबॅग असणे आवश्यक आहे, हे सरकारने आधीच बंधनकारक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारच्या एअरबॅग्स हे प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्ये मानले जातात.