

Upcoming Electric Cars : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढत आहे. भारत सरकार EV खरेदीदारांसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यावरही काम करत आहे. टाटा मोटर्स सध्या 85% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह ईव्ही सेगमेंटवर राज्य करत आहे. पण, येत्या काळात इतर अनेक वाहन निर्माते देखील इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहेत, ज्यामुळे स्पर्धा वाढेल. आम्ही तुम्हाला पुढील 18 महिन्यांत लाँच होणाऱ्या टॉप-5 इलेक्ट्रिक कार्सबद्दल सांगत आहोत.
MG COMET EV
MG Motor India एप्रिल 2023 मध्ये देशात नवीन एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार (MG COMET EV) लाँच करू शकते. ही 2-दरवाज्यांची इलेक्ट्रिक कार असेल, ज्याची लांबी फक्त २.९ मीटर असेल. ती टाटा नॅनोपेक्षाही लहान आहे. ही कार सुमारे 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च केली जाऊ शकते.
TATA PUNCH EV
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स या वर्षाच्या अखेरीस पंच मायक्रो एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही जेन 2 (सिग्मा) प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. यामध्ये 26kWh आणि 30.2kWh या दोन बॅटरी पॅकचा पर्याय दिला जाऊ शकतो.
हेही वाचा – कशालाही हात लावाल तर दंड…! भारतातील ‘या’ गावाचा अजब कायदा; नक्की वाचा!
TATA CURVV
Tata Motors पुढील वर्षी (2024) Curvv SUV (इलेक्ट्रिक आणि ICE पॉवरट्रेन) कूप लाँच करेल. हे MG ZS EV, Hyundai Kona EV आणि Mahindra XUV400 ला टक्कर देईल. हे GEN 2 प्लॅटफॉर्मवर देखील आधारित असेल.
MAHINDRA XUV e8
2022 मध्ये, महिंद्राने INGLO बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित 5 इलेक्ट्रिक SUV संकल्पना उघड केली. या SUV XUV आणि BE ब्रँड अंतर्गत विकल्या जातील. XUV इलेक्ट्रिक ब्रँड अंतर्गत लॉन्च होणारे पहिले उत्पादन XUV.e8 असेल, जे डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्च केले जाऊ शकते.
BYD SEAL
BYD ने 2023 ऑटो एक्स्पोमध्ये SEAL इलेक्ट्रिक सेडानचे प्रदर्शन केले. इलेक्ट्रिक सेडान 2023 च्या चौथ्या तिमाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याची किंमत अंदाजे 70 लाख रुपये आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!