FASTag आणि टोल नाक्यांची ‘झंझट’ संपणार! गडकरींचा ‘मास्टरप्लॅन’ ऐकला का?

WhatsApp Group

toll tax from the number plate : फास्टॅगच्या (FASTag) त्रासातून देशाला लवकरच मुक्ती मिळणार आहे. यासोबतच टोलनाकेही आता बदलणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील टोल हटवून ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेऱ्यातून टोल टॅक्स वसूल करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिलीय.

कसा घेतला जाणार टोल?

बिझनेस स्टँडर्डवर प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, सध्या टोल प्लाझावर फास्टॅगच्याद्वारे कर कापला जातो. पण, लवकरच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे हे काम करतील. कॅमेरे या स्वयंचलित नंबर प्लेट्स वाचतील आणि तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्सचे पैसे कापले जातील. यासंदर्भात माहिती देताना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, या योजनेवर पथदर्शी प्रकल्प म्हणून काम सुरू आहे. ही योजना लागू करण्यासाठी कायदेशीर सुधारणा करण्याचाही विचार केला जाईल.

बसवण्यात येणार नंबर प्लेट रीडर कॅमेरे

नितीन गडकरी म्हणाले, की आता टोल प्लाझा हटवण्याची आणि नंबर प्लेट रीडर कॅमेरे बसवण्याची तयारी सुरू आहे, जे वाहनचालकांकडून टोल टॅक्स वसूल करतील. रिपोर्टनुसार, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेऱ्यांद्वारे टोल टॅक्स वसूल करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. मात्र, या प्रकल्पातही काही अडथळे निर्माण होत असून, ते सोडवण्याचा विचार सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. उदाहरणार्थ, नंबर प्लेटवर नंबर सोडून दुसरं काही लिहिले असेल तर कॅमेऱ्याला अडचण येऊ शकते.

हेही वाचा – NDTV चॅनेलमधून रवीश कुमारांचा राजीनामा? ट्वीट करत म्हणाले, “मोदींनी…”

गडकरी म्हणाले, ”याशिवाय आणखी एका मोठ्या समस्येबद्दल बोलायचं झालं तर टोल टॅक्स न भरणाऱ्या वाहनचालकाला शिक्षा कशी करायची, कारण टोल टॅक्स चुकवणाऱ्या वाहनधारकाला शिक्षा करण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. यालाही कायद्याच्या कक्षेत आणण्याची गरज आहे. ज्या वाहनांवर अशा नंबरप्लेट नाहीत, त्यांना ती बसवण्यासाठी ठराविक वेळ देण्यात येईल.”

फास्टॅगद्वारे कलेक्शन

सरकारनं टोल टॅक्स कपातीसाठी फास्टॅग लागू केल्यानंतर, कपातीसाठी लागणारा वेळ सोबतच, टोल प्लाझावरील लांबलचक रांगांनाही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या महामार्गावरील एकूण ४०००० कोटी रुपयांच्या एकूण टोल टॅक्सपैकी ९७ टक्के रक्कम फास्टॅग वरून गोळा केली जात आहे. तर रोख किंवा कार्डद्वारे तीन टक्के कर वसूल केला जात आहे.

हेही वाचा – मुंबईत ना दिल्लीत, एलोन मस्कचा ‘हा’ मराठमोळा मित्र राहतो पुण्याच्या गल्लीत!

फास्टॅग आल्यानंतर, टोल प्लाझा ओलांडण्यासाठी वाहनाला लागणारा सरासरी वेळ सुमारे ४७ सेकंद आहे. आधीच्या मॅन्युअल पद्धतीनं वसुली करताना, जिथं एका तासात सुमारे ११२ वाहनं टोलमधून जातात, ही सुविधा सुरू झाल्यानंतर, एका तासात २६० हून अधिक वाहनं सहजपणे टोल ओलांडतात.

फास्टॅगच्या समस्या

देशात टोल वसुलीची फास्टॅग प्रणाली लागू झाल्यानंतर काही फायदे होत असतानाच काही मोठ्या समस्याही समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ, काही वाहनांवर फास्टॅग बसवलेला आहे, परंतु खात्यातील शिल्लक कमी असल्यामुळं विलंब होतो. याशिवाय काही वेळा काही टोल प्लाझावर इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्याही येतात, त्यामुळं बराच वेळ जातो. या सर्व समस्या लक्षात घेऊन सरकारनं नवा आराखडा तयार केला आहे. त्यात आलेल्या अडचणी दूर केल्यानंतर ही प्रणाली लवकरच देशात लागू होऊ शकते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment