

Toll Plaza : काही वर्षांपूर्वीपर्यंत टोल प्लाझावर खूप गर्दी असायची आणि लोकांना प्लाझा ओलांडताना खूप त्रास व्हायचा, पण नंतर केंद्र सरकारने Fashtag प्रणाली अनिवार्य केली. या संदर्भात, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक नियम केले, ज्याचा उद्देश Fashtag प्रणाली अधिक चांगल्या प्रकारे लागू करणे हा होता. Fashtag प्रणालीमुळे दोन खास गोष्टी घडल्या, पहिली म्हणजे टोल टॅक्स वसुली वाढली आणि दुसरी टोल प्लाझावरील गर्दी कमी झाली.
टोल प्लाझावर उत्तम सेवेसाठी नियम
मे २०२१ मध्ये, NHAI ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यानुसार प्रत्येक टोल प्लाझावर प्रत्येक वाहनाची सेवा वेळ १० सेकंदांपेक्षा जास्त नसावी. हा नियम पीक अवर्समध्ये (म्हणजे टोल प्लाझावर जास्त रहदारी असताना) देखील लागू होईल. सर्व्हिस टाइम म्हणजे टोल टॅक्स वसूल केल्यानंतर गाडीला प्लाझा सोडण्याची परवानगी दिलेली वेळ.
हेही वाचा – Banking : ग्राहकांना धक्का..! SBI चं कर्ज झालं महाग; भरावा लागणार जास्त EMI
यासोबतच, ‘टोल प्लाझावर १०० मीटरपेक्षा जास्त लांब वाहनांची रांग नसावी’, असेही नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे. यासाठी NHAI ने प्रत्येक टोल बूथपासून १०० मीटर अंतरावर पिवळी पट्टी बनवण्याची तरतूद केली आहे, जेणेकरून लोकांना टोलच्या आधी १०० मीटरचे अंतर कळू शकेल.
नियम काय आहेत?
नियमांनुसार, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल प्लाझावरील टोल कापल्यानंतर वाहनाने पुढे जाण्यासाठी १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागल्यास, टोल टॅक्स न भरता ते पुढे जाऊ शकते. याशिवाय टोल प्लाझावर १०० मीटरपेक्षा जास्त लांब वाहनांची रांग असल्यास टोल बुथच्या १०० मीटरच्या आत रांग येईपर्यंत टोल न भरता वाहनांना जाऊ दिले जाईल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!