राजकीय नेत्यानं घरात ठेवले बॉम्ब, बॉल समजून खेळू लागली मुलं, स्फोट झाला अन्…!

WhatsApp Group

TMC Leader Abul Hossain House Bomb Blast : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना जिल्ह्यातील मिनाखा येथे, टीएमसी नेते अबू हुसैन गायन यांच्या घरी ठेवलेल्या बॉम्बला बॉल असल्याचे समजून मुलांनी खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा स्फोट झाला ज्यामध्ये एक बालक ठार झाला आणि काही मुले जखमी झाली. पोलिसांनी अबू हुसैन याला अटक केली आहे. घटना चपली गावची आहे. पोलिसांनी या घटनेबद्दल सांगितले की, ‘बुधवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास तृणमूल नेते अबुल हुसैन गायन यांचे नातेवाईक त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी आले. त्याची ८ वर्षांची भाची झुमा खातून, बॉल समजून बॉम्बशी खेळत होती. यानंतर स्फोट झाला. या अपघातात अल्पवयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.

बशीरहाटचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौथम बॅनर्जी आणि एसडीपी अमिनुल इस्लाम यांच्या नेतृत्वाखाली मीनाखा पोलीस स्टेशनचे अधिकारी सिद्धार्थ मंडल मोठ्या पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रश्न असा आहे की, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने घरात बॉम्ब का ठेवला? की यामागे राजकीय षडयंत्र आहे? यामागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पंचायत निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बॉम्ब पेरले होते का याचाही पोलीस अधिकारी तपास करत आहेत.

हेही वाचा – Petrol-Diesel Price : तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा रेट  

पोलिसांनी तृणमूलचे नेते अबुल हुसैन गायन यांची कोठडीत चौकशी सुरू केली आहे. गावात तणावाचे वातावरण पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तृणमूल नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याच्या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधी ६ नोव्हेंबरला पश्चिम बंगालमधील देगंगा येथे टीएमसी नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट झाला होता. पोलिसांनी या घटनेबद्दल सांगितले होते की स्थानिक टीएमसी नेत्याच्या बांधकामाधीन इमारतीत काही मजूर काम करत होते. पायऱ्यांखाली काही बॉम्ब ठेवण्यात आले होते. या स्फोटात दोन कामगार गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी विश्वनाथपूर पिंप्री रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बांधकामाच्या जागेवरून ३ जिवंत बॉम्ब जप्त केले.

Leave a comment