Viral Video : नवऱ्याशी भांडण करणाऱ्या महिलेला वाघाने नेलं उचलून..! पाहा भयानक व्हिडिओ

WhatsApp Group

Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा भितीदायक व्हिडिओ समोर येतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला जंगल सफारीसाठी पोहोचल्याचे दिसत होते. गाडीतून खाली उतरताच तिला वाघाने उचलून नेले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या पतीसोबत जंगल सफारीवर गेल्याचे दिसत आहे. दोघेही गाडी घेऊन जंगलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर ती महिला गाडी थांबवते आणि खाली उतरू लागते. व्हिडिओमध्ये ती आपल्या पतीवर रागावलेली देखील दिसत आहे, त्याच दरम्यान एक वाघ धावत येतो आणि महिलेला ओढून नेतो.

हेही वाचा – Jetson One : आली हवेत उडणारी इलेक्ट्रिक कार..! लायसन्सचीही गरज नाही; किंमत आहे ‘इतकी’

महिलेला पाहताच तिचा नवराही गाडीतून वेगाने बाहेर पडतो पण तो आपल्या पत्नीला वाचवू शकत नाही. दरम्यान, कारमध्ये बसलेले एक बालकही वाघाच्या दिशेने धावताना दिसत आहे. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही लोक म्हणाले की, अशा ठिकाणी काहीही करू नये, तर काही लोकांनी या व्हिडीओतून शिकायला हवे की, कुठेही भांडण करू नका, असे म्हटले आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 16 मिलियनहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचवेळी 4 हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या, 76 जणांनी त्याला लाईक केले आणि हजारो लोकांनी रिट्विट केले. लक्षात घेण्यासारखे आहे की हा व्हिडीओ कधीचा आणि कुठे आहे हे समोर आलेले नाही पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment