Forbes : टॉप २० आशियाई महिला उद्योजकांची यादी जाहीर..! ३ भारतीयांचा दबदबा

WhatsApp Group

Forbes Asian Power Women 2022 List : फोर्ब्सच्या टॉप २० आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत ३ भारतीय महिला उद्योजकांचीही नावे आहेत. या यादीत अशा महिलांचा समावेश आहे ज्यांनी कोविड-१९ साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. फोर्ब्सच्या नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या यादीत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) च्या अध्यक्षा सोमा मंडल, एमक्योर फार्माच्या कार्यकारी संचालक नमिता थापर आणि होनासा कंझ्युमरच्या सह- संस्थापक आणि मुख्य नवोन्मेष अधिकारी गझल अलघ यांची नावे आहेत.

फोर्ब्सने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या यादीत भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, तैवान आणि थायलंडमधील महिलांचा समावेश आहे. या यादीतील महिला शिपिंग, रिअल इस्टेट आणि बांधकाम, तंत्रज्ञान, औषध आणि कमोडिटी या क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत. कोविड-१९ सारख्या कठीण काळातही या महिलांनी हिंमत हारली नाही आणि व्यवसायाला नवी उंची दिली, असे फोर्ब्सचे म्हणणे आहे.

हेही वाचा – ‘आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण’ पुरस्कार : शिक्षिका आसावरी कदम यांचा काठमांडू येथे गौरव!

सोमा मंडल यांनी १ जानेवारी २०२१ रोजी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) चे अध्यक्षपद स्वीकारले. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. नमिता थापर एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या सीईओ आहेत. त्यांनी ग्रॅज्युएशन पुणे, महाराष्ट्र येथून केले. ICAI मधून चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी घेऊन ती अमेरिकेला गेली. काही काळानंतर त्या भारतात आल्या आणि इथे व्यवसाय सुरू केला. नमिता थापर या करोडोंच्या मालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नमिता थापर यांची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपये आहे.

हरयाणाच्या गुरुग्राममध्ये जन्मलेल्या गझल अलघ यांचे नावही फोर्ब्सच्या यादीत आहे. गझल यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी NIIT लिमिटेडमध्ये कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून दोन वर्षे काम केले होते. २०१६ मध्ये, गझल अलघ यांनी त्यांचे पती वरुण अलघ यांच्यासमवेत होन्सा कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेडची पायाभरणी केली. हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या FMCG ब्रँडपैकी एक आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment