Viral Video : आयफोन 14 घेण्यासाठी 1.5 लाखांची नाणी घेऊन गेला ‘हा’ व्यक्ती; पाहा दुकानदारानं काय केलं!

WhatsApp Group

Viral Video : राजस्थानमध्ये एक रंजक घटना समोर आली आहे. या वर्षी लॉन्च केलेला आयफोन 14 (iPhone 14) विकत घेण्यासाठी एक व्यक्ती Apple Store मध्ये गेली, परंतु या काळात त्याने पेमेंटची पद्धत म्हणून ऑनलाइन किंवा कार्डद्वारे कोणताही पर्याय निवडला नाही. आयफोन घेण्यासाठी त्याने रोख रकमेचा मार्ग निवडला. पण त्याने सर्व पेमेंट नाण्यांमधून करायचे ठरवले. होय, तुम्ही बरोबर वाचले, फक्त नाणी. आता तुम्ही विचार करत असाल की एवढा महागडा फोन घेण्यासाठी कोणी इतकी नाणी कशी आणू शकते.

नक्की प्रकरण काय?

रिपोर्ट्सनुसार, राजस्थानमधील एका व्यक्तीने स्टोअरमध्ये जाऊन iPhone 14 खरेदी करण्यासाठी १.५ लाख रुपयांची नाणी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. यावरून त्याचा दुकानमालकाशी वाद झाला. अमित शर्मा असे या व्यक्तीचे नाव असून तो क्रेझी एक्सवायझेड नावाचे यूट्यूब चॅनल चालवतो. त्याने या चॅनलवर नाण्यांसह आयफोन खरेदी करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मात्र, व्हिडिओच्या शेवटी हा विनोद असल्याचे त्याने उघड केले. लोकांना वाटले की ही खरी घटना आहे, पण तसे नव्हते. हा यूट्युबरने शूट केलेला प्रँक व्हिडिओ होता.

हेही वाचा – करोडो ग्राहकांना HDFC कडून मोठा धक्का..! आजपासून लागू केला ‘हा’ नियम; वाचा!

व्हायरल झाला व्हिडिओ

हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून त्याला जवळपास ४ मिलियनवेळा पाहिला गेला आणि त्याला ३ मिलियन सोशल मीडिया लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये, अमित ऍपल स्टोअरमधून iPhone 14 खरेदी केल्यानंतर पेमेंटवर चर्चा करताना दिसत आहे. त्यांनी दुकानदाराकडे रोख रक्कम मागितली असता त्यांनी त्यांच्यासमोर नाण्यांचा ढीग मांडला. हे पाहून तेथे उपस्थित असलेले लोक हादरले. नाणी मोजण्यावरून दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वादावादी झाली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment