Company Is Paying For Sleep : कोणतीही कंपनी तुम्हाला झोपण्यासाठी पैसे देईल का? असे टोमणे तुम्ही ऐकले असतील, पण अशी ऑफर कधीच ऐकली नसेल. एक कंपनी आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी पैसे देत आहे. हूप (Whoop) हे फिटनेस ट्रॅकर्सच्या जगात खूप लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी ही कंपनी आपल्या हेल्थ ट्रॅकिंग बँडमुळे चर्चेत होती.
अलीकडेच WHOOP चे सीईओ विल अहमद यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. एका प्रकाशनाला दिलेल्या मुलाखतीत विल यांनी सांगितले की त्यांची कंपनी ‘अनलॉकिंग ह्युमन परफॉर्मन्स’ या उद्देशावर काम करत आहे.
हेही वाचा – ओमिक्रॉनचा सब-व्हेरिएंट ‘FLiRT’ ची भारतात एन्ट्री, अनेक राज्यांना धोका, ‘ही’ आहेत लक्षणे!
2021 मध्ये कंपनीने $200 मिलियन निधी उभारला होता. ही कंपनी 2012 मध्ये सुरू झाली आणि 500 कर्मचारी कार्यरत आहेत. विल म्हणाले की, आमचा विश्वास आहे की ऑफिसमधील काम नेहमीच चांगली उत्पादकता देते. लोक एकमेकांना भेटतात त्यामुळे सकारात्मक वातावरण कसे निर्माण होते हे आपण पाहिले आहे.
इतकंच नाही तर त्यांची कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना झोपण्यावर बोनस देते असंही त्यांनी सांगितलं. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हूप सारखे स्टार्टअप कर्मचाऱ्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. कंपनी तिच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत हूप बँड आणि सदस्यत्व प्रदान करते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा