जगातील सर्वात महाग ख्रिसमस ट्री, किंमत इतकी की मुंबईत घ्याल बडे-बडे बंगले!

WhatsApp Group

जगात ख्रिसमसचा सण साजरा होणार आहे. 25 डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या या सणाची खास गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी सजवलेली ख्रिसमस ट्री. मॉल असो की दुकान, ऑफिस असो की घर. सर्वत्र रंगीबेरंगी ख्रिसमस ट्री सजले आहेत. या सजावटीशिवाय ख्रिसमसचा सण खूपच निस्तेज दिसतो. कुठेतरी लहान ख्रिसमस ट्री आहेत तर कुठे मोठी, पण सर्वात महागडा ख्रिसमस ट्री (World’s Most Expensive Christmas Tree) कधी आणि कुठे बनवला गेलाय, हे तुम्हाला माहिती आहे का?

आतापर्यंत 3 सर्वात महागड्या ख्रिसमस ट्रींचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे तीन ख्रिसमस ट्री जगातील 3 वेगवेगळ्या देशांमध्ये बनवले गेले आहेत. सर्वात महागडा ख्रिसमस ट्री स्पेनमध्ये बनवण्यात आला आणि दुसरा सर्वात महागडा ख्रिसमस ट्री अबू धाबीमध्ये बनवण्यात आला. यानंतर तिसरा सर्वात महागडा ख्रिसमस ट्री जपानची राजधानी टोकियोमध्ये बनवण्यात आला.

स्पेनमधील सर्वात महाग ख्रिसमस ट्री

2019 मध्ये, स्पेनमधील मार्बेला येथील केम्पिंस्की हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांना त्यांच्यासमोर हिरे आणि दागिन्यांनी भरलेले झाड पाहून आश्चर्य वाटले. सुमारे 15 फूट उंचीचे हे ख्रिसमस ट्री अनेक हिरे आणि डिझायनर दागिन्यांनी सजले होते. त्यावर लाल, पांढरा, गुलाबी आणि काळ्या रंगाचे हिरे होते. हे झाड डेबी विंगहॅमने डिझाइन केले होते, ज्याची किंमत सुमारे 125 कोटी रुपये आहे.

हेही वाचा – तरुणांसाठी वरदान मुद्रा कर्ज योजना! अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे लागतील?

दुबईत बनवलेले दुसरे महागडे ख्रिसमस ट्री

याच्या अनेक वर्षांपूर्वी म्हणजे 2010 मध्ये अबुधाबीच्या एमिरेट्स पॅलेस हॉटेलमधील ख्रिसमस ट्री ब्रेसलेट, नेकलेस आणि घड्याळांनी सजवण्यात आले होते. त्यात अनेक हिरे, महागडे खडे आणि सुंदर डिझायनर ज्वेलरी वापरण्यात आली होती. या ख्रिसमस ट्रीची किंमत सुमारे 91.3 कोटी रुपये ती. त्यानंतर त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले.

तिसरा सर्वात महाग ख्रिसमस ट्री

2016 मध्ये, जपानची राजधानी टोकियो येथील ज्वेलर्स गिन्झा तनाका यांनी त्यांच्या दुकानात सोन्याच्या तारांनी बनवलेले ख्रिसमस ट्री सजवले होते. ते बनवण्यासाठी 4,000 फूट पातळ सोन्याच्या तारांचा वापर करण्यात आला. या ख्रिसमस ट्रीची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे.

हेही वाचा – RAC प्रवाशांसाठी मोठी घोषणा, रेल्वेकडून मिळणार खास सुविधा!

अशाप्रकारे तुम्ही पाहिले, की या ख्रिसमसच्या ट्रीची किंमत इतकी जास्त आहे की तुम्ही त्याची किंमत मोजून डझनभर मर्सिडीज आणि फेरारी खरेदी करू शकता. या दोन्ही कारची कमाल किंमत 3 ते 4 कोटी आहे. याशिवाय, जर तुम्हाला मुंबईच्या पॉश भागात व्हिला घ्यायचा असेल तर तुम्ही डझनभर व्हिला खरेदी करू शकता. विराट कोहलीने नुकताच अलिबागमध्ये 2,000 स्क्वेअर फुटांचा व्हिला खरेदी केला आहे, ज्याची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment