Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती नवजात बाळाला एका बॉक्समध्ये टाकून पाण्यात टाकणार होता. शेवटच्या क्षणी काही स्थानिक लोकांनी त्या व्यक्तीला पाहिलं. लोकांनी बॉक्स उघडण्यास सांगितल्यावर या प्रकरणावरून पडदा उचलण्यात आला. आजूबाजूचे लोकही थक्क झाले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काश्मीर खोऱ्यात एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत बॉक्स घेऊन जात असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. काही लोकांनी त्याला थांबवून बॉक्स दाखवण्यास सांगितलं असता त्यानं टाळाटाळ सुरू केली. शेवटी त्यानं बॉक्स उघडला. त्या बॉक्समध्ये एक नवजात बाळ होतं. हा व्हिडीओ खोऱ्यातील कोणत्या भागाचा आहे हे कळू शकलेलं नाही.
हेही वाचा – VIDEO : सांगलीत साधूंना बेदम मारहाण..! पोरामुळं ‘एक’ अफवा पसरली आणि लोकांनी काठ्याच काढल्या
One Mohd Abas of Shar Shali Pulwama identifies in case related to a newborn baby. As per him,the baby was still-born, he wasn't able to justify his attempt of throwing body of infant into river. The claim is being ascertained from doctors in LD hospital for further legal action. pic.twitter.com/w2DlMeVK1Q
— Srinagar Police (@SrinagarPolice) September 14, 2022
कोण होता तो माणूस?
मोहम्मद अब्बास असं या व्यक्तीचे नाव असून तो पुलवामा येथील शारशाली येथील रहिवासी आहे. पोलिसांनी याप्रकरणी सांगितलं, की ”अब्बासचा दावा आहे की, नवजात बाळ मृत जन्माला आलं होतं म्हणून तो नदीत फेकून देणार होता. त्यानं नदीत फेकण्याचा प्रयत्न का केला, हे तो सिद्ध करू शकला नाही.” अब्बासच्या चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यासाठी डॉक्टरांकडूनही चौकशी करण्यात येत असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करता येईल.