bride injured her groom : उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. नव्या नवरीनं आपल्याच नवऱ्याला जखमी केलंय. तिनं आपल्याच नवऱ्याचा चावा घेतला. जखमी नवऱ्यानं पोलीस ठाणं गाठून बायकोविरोधात तक्रार दाखल केली. नवऱ्याचा आरोप आहे, की त्याच्या बायकोला ड्रग्जचं व्यसन आहे. नशेच्या अवस्थेत हुल्लडबाजी, मारहाणीचे प्रकार घडतात. याप्रकरणी पोलीस तपास करत असून कारवाईची चर्चा आहे.
दारू पिण्यासोबतच गांजाचं सेवन…
टप्पल पोलीस स्टेशन हद्दीतील खंडया गावातील हे प्रकरण आहे. नवी नवरी दारू पिण्यासोबतच गांजा सेवन करते, अशी फिर्याद पीडित नवऱ्यानं पोलीस ठाण्यात दिली आहे. दारूच्या नशेत ती घरात कलह निर्माण करते. नवऱ्यानं फिर्यादीत म्हटलं आहे की, रात्री १२ वाजता तिनं नवऱ्याल गाढ झोपेतून उठवलं. यानंतर भांडण करून बांगड्या फोडल्या. यावरून तिनं भिंतीवर डोकं आपटलं.
हेही वाचा – मुलींना का करायचं नसतं लग्न? प्रश्नाच्या खोलात गेलात तर मिळतील ‘अशी’ उत्तरं!
कुठं चावा घेतला?
नवऱ्याचा आरोप आहे, की बायको मारामारी करत असताना तिनं त्याच्या हातावर आणि छातीवर दातानं चावा घेतला. यावरून सासरच्यांनीही जीवे मारण्याची धमकी देऊन आरडाओरडा सुरू केला. यामुळं व्यथित होऊन त्यांनी ११२ क्रमांकावर माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नवविवाहित नवरीपासून सुटका करून घ्यावी, असं नवऱ्यानं सांगितलं. सध्या त्याची मानसिक अवस्था वाईट आहे.
सीओ आरके सिसोदिया यांनी सांगितलं, की याप्रकरणी नवऱ्याच्या तक्रारीच्या आधारे टप्पल पोलीस स्टेशनने तपास सुरू केला आहे. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. पीडित नवऱ्यानं आपल्या नवविवाहित बायकोवर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा – हा काय डोक्याला नवीन ‘ताप’? कोरोनानंतर भारतात वाढतोय Tomato Flu!
यूपीमध्ये ‘डॉली की डोली’
यापूर्वी उत्तर प्रदेशमधून एक प्रकरण समोर आलं होतं. ‘डॉली की डोली’ हा बॉलिवूड चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. फर्रुखाबाद जिल्ह्यात अशाच प्रकारे एका डॉली म्हणजेच दरोडेखोर नववधूला तिच्या इतर साथीदारांसह पोलिसांनी अटक केली होती. दरोडेखोर नवरीचं वय अवघे २३ वर्षे, पण कारनामे असे आहेत की तुम्हीही थक्क व्हाल. कधी खुशबू तर कधी रुबी असं नाव सांगणाऱ्या या तरुणीनं लग्नाचं नाटक करून आजवर अनेकांना आपला शिकार बनवलं. टोळीचे सदस्य मिळून फसवणुकीची तयारी करायचं. प्रत्येकाची काही ना काही भूमिका नक्कीच होती. जुने बॅचलर त्यांचे खास लक्ष्य होते. ही टोळी लग्नानंतर लग्नाचे विधी पूर्ण करायची. यानंतर वधू लग्नाच्या रात्रीच दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार होत असत.