Tesla Optimus Robot : मुलांची काळजी घेण्यापासून कुत्र्याला फिरवण्यापर्यंत, टेस्लाने आणला ‘ऑप्टिमस’ रोबोट!

WhatsApp Group

Tesla Optimus Robot : काल रात्री झालेल्या ‘वी, रोबोट’ इव्हेंटमध्ये टेस्लाने आपला सायबरकॅब आणि ह्युमनॉइड रोबोट ‘ऑप्टिमस’ सर्वांसमोर सादर केला. एलोन मस्क यांनी ऑप्टिमसबद्दल दावा केला की ते आता “काहीही करू शकतात.”मस्क यांच्या मते, ऑप्टिमस रोबोटची क्षमता जवळजवळ अमर्यादित आहे. त्यांनी सांगितले की हा रोबोट कुत्र्याला फिरवून आणणे, मुलांची काळजी घेणे, गवत कापणे आणि पेये सर्व्ह करणे यासारखी कामे करू शकतो.

भविष्यात या रोबोटची किंमत 20,000 ते 30,000 डॉलर्स दरम्यान असेल असा अंदाजही मस्क यांनी व्यक्त केला आहे. “मला विश्वास आहे की हे आतापर्यंतचे सर्वात महत्वाचे उत्पादन असेल.” मस्क पुढे म्हणाले, “मला वाटते की पृथ्वीवरील 8 अब्ज लोकांपैकी प्रत्येकाला एक ऑप्टिमस बडी हवा असेल. हा रोबोट जगात पूर्वीपेक्षा अधिक क्रांती करेल!”

हेही वाचा – SIP पेक्षा SWP चांगलं? स्मार्ट गुंतवणूक करून बनता येईल करोडपती! जाणून घ्या कसं

डिसेंबर 2023 मध्ये, टेस्लाने त्याच्या ह्युमनॉइड रोबोट ‘ऑप्टिमस जेन 2’ चे नवीन व्हर्जन सादर केले, जे मागील मॉडेलपेक्षा अनेक पटींनी चांगले आहे. पूर्वीचे मॉडेल फक्त चालणे आणि बोलण्यात सक्षम होते, परंतु जेन 2 व्हर्जनमध्ये वेगाने चालण्याची क्षमता, प्रगत हाताची हालचाल, बोटांवरील स्पर्शासंबंधी सेन्सर यासारख्या नवीन फीचर्सचा समावेश आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला मस्क यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता व्हिडिओमध्ये, रोबोट एका टोपलीतून शर्ट उचलताना आणि टेबलवर व्यवस्थित फोल्ड करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, मस्क यांनी ऑप्टिमसला माणसांसारखे चालताना दाखवले. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत, कारण रोबोटचे एक्सप्रेशन अगदी मानवी दिसत होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment