Viral Video : टेस्लाची ऑटोमॅटिक कार नियंत्रणाबाहेर..! अचानक धावू लागली रस्त्यावर

WhatsApp Group

Tesla Automatic Car Accident Viral Video : सोयीच्या दृष्टीने ऑटोमॅटिक कार अतिशय आरामदायक मानली गेली आहे, परंतु या कारमुळे अपघाताचा धोका वाढतो. चीनमधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये टेस्ला कारने दोन लोकांचा मृत्यू आणि तीन जण जखमी केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या अपघातानंतर कार निर्माता कंपनी टेस्लाने तपासात सहकार्य करण्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि युजर्सही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की चीनमधील टेस्लाच्या मॉडेल वाई कारने चालताना नियंत्रण गमावले, ज्यामुळे अनेक अपघात झाले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही कार पार्क करणार होती, पण तिचे नियंत्रण सुटते आणि अनेक अपघात होतात.

हेही वाचा – शिक्षकांचा मार खाल्लाय? दाढी का ठेवता? मुलांच्या प्रश्नांना CM शिंदेंची दिलखुलास उत्तरं!

व्हिडीओमध्ये ही कार खूप वेगाने जात असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे ती आपल्या मार्गात जे काही येत आहे ते ठोकून पुढे जात आहे. कार अनेक रस्ते ओलांडत आहे आणि वाटेत समोरून येणाऱ्या सर्व दुचाकी, सायकल आणि वाहनांना धडकताना दिसते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेबद्दल यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, टेस्लाच्या मॉडेल वाई कारच्या भीषण अपघाताचा तपास करण्यासाठी कंपनी चिनी पोलिसांनाही मदत करेल. टेस्ला कारला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

Leave a comment