भारताच्या हद्दीतून जाणाऱ्या विमानात बॉम्ब..! पायलटनं दिल्लीत लँडिंगसाठी परवानगी मागितली, पण…

WhatsApp Group

Tehran Flight Received A Bomb Threat : तेहरानहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आहे. ही बातमी आल्यानंतर त्यांनी दिल्लीत इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. ही परवानगी नाकारल्यानंतर विमान चीनच्या दिशेने निघाले आणि भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महान एअरने इराणमधील तेहरानहून चीनमधील ग्वांगझूला जाताना दिल्ली विमानतळाच्या एटीसीशी (एअर ट्रॅफिक कंट्रोलला) संपर्क साधला होता. विमान कंपनीला दिल्लीत तातडीने लँडिंग करण्यासाठी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. दिल्ली एटीसीने विमानाला जयपूरला जाण्याची सूचना केली पण विमानाच्या पायलटने नकार देत भारतीय हवाई हद्द सोडली.

एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले, की भारतीय हवाई हद्दीत इराणी प्रवासी जेटमध्ये बॉम्बची धमकी मिळाली आहे. हे विमान चीनला जाणार आहे. यानंतर भारतीय वायुसेनेला सतर्क करण्यात आले आणि अनेक IAF जेटने उड्डाण घेतले. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर जोधपूर आणि पंजाब येथून हवाई दलाच्या सुखोई-३० लढाऊ विमानांनी विमानावर लक्ष ठेवण्यासाठी उड्डाण केले. इराणचे पॅसेंजर जेट आता चीनच्या दिशेने जात असल्याचे बोलले जात आहे. सुरक्षा यंत्रणा विमानावर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा – VIDEO : भाजपचे कार्यकर्ते पुतळा जाळायला निघाले, इतक्यात काँग्रेसवाल्यांनी पुतळाच पळवला!

हे विमान आता कुठे आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. दिल्ली पोलीस आणि इतर यंत्रणांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या विमानाला जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. बॉम्बच्या धमकीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, असे सांगण्यात येत आहे. यासोबतच विमानाचा मार्ग दिल्लीच्या दिशेने वळवल्याचीही माहिती मिळाली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment