आयव..! शाळेच्या दप्तरातून निघाला नागोबा; पाहा व्हायरल VIDEO!

WhatsApp Group

Snake From Schoolbag : कल्पना करा की शाळेच्या दप्तरातून पुस्तकाऐवजी नाग बाहेर आला तर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तविक, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील एका शाळेत विद्यार्थिनीच्या बॅगेतून काळा नाग बाहेर आल्याचे पाहायला मिळत आहे, जे पाहून शिक्षिकाही थक्क झाल्या.

एका दप्तरातून नाग कसा बाहेर आला, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ धक्कादायक आहे. हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ”इयत्ता १०ची विद्यार्थिनी कु. उमा रजक हिच्या दप्तरातून नाग निघाला. शाळेत आल्यानंतर दप्तर उघडताच त्यात काहीतरी हलत असल्याचे मुलीला जाणवले. तिनं शिक्षकाकडे तक्रार केली. शिक्षिकेने बॅग उघडली तेव्हा त्याही नाग बघून घाबरल्या”, अशा कॅप्शनसहित हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता करण वशिष्ठ यांनी शेअर केला आहे.

 

Leave a comment