TCS कंपनीमधून अनेक महिला देतायत राजीनामा, ‘हे’ आहे कारण!

WhatsApp Group

TCS Employees Resignation : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ही भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी आहे. पण सध्या लोक TCSची नोकरी सोडण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामागील कारणही खूप धक्कादायक आहे. TCSचे जे कर्मचारी नोकरी सोडत आहेत, त्यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. वास्तविक TCS आता आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम देत नाही आणि या कारणास्तव अनेक महिला कर्मचारी येथील नोकरी सोडत आहेत.

TCSच्या नवीन धोरणानुसार कर्मचाऱ्यांना यापुढे घरून काम करण्याची परवानगी नाही आणि फर्मच्या महिला कर्मचाऱ्यांना हे आवडत नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात कंपनीत अचानक राजीनामा देण्याचे प्रमाण वाढले असून त्यात केवळ महिला कर्मचारी आहेत.

कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या

TCS च्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळात महिला कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याच्या किंवा बदलण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे कारण इथे वर्क फ्रॉम होम कल्चर संपुष्टात येत आहे. TCS ही आयटी क्षेत्रातील अशी कंपनी असली तरी, जी महिलांना नोकरी देण्यामध्ये नेहमीच अग्रेसर मानली जाते.

हेही वाचा – अरे! आज शेवटची तारीख, फ्रीमध्ये करा आधार अपडेट, नाहीतर होईल….

TCS च्या कर्मचाऱ्यांची संख्या

TCS मध्ये 6 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात आणि यापैकी सुमारे 35 टक्के महिला कर्मचारी आहेत. या आयटी फर्मने 2023 या आर्थिक वर्षात 38.1 टक्के महिला कर्मचाऱ्यांना कायम ठेवले होते, म्हणजेच या महिला कर्मचाऱ्यांना आपल्याकडे ठेवण्यात यश आले होते. या महिला कर्मचाऱ्यांपैकी तीन चतुर्थांश कर्मचारी अशा आहेत जे कंपनीत उच्च पदांवर कार्यरत आहेत. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या आर्थिक वर्षात, TCS च्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 20 टक्के कामगारांनी कंपनी सोडली आहे.

TCS HR प्रमुख मिलिंद लक्कड यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हापासून कंपनीने घरून काम संपवण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून अधिक राजीनामे दिसू लागले आहेत – विशेषत: महिला कर्मचाऱ्यांकडून. यामागे अतिरिक्त कारणे असू शकतात, परंतु हे मुख्य कारण असल्याचे दिसते. TCSमधील महिला कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यामागचे कारण लिंगभेद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुरुष कर्मचार्‍यांच्या तुलनेत TCS मधील महिला कर्मचार्‍यांचे राजीनामे देण्याचे प्रमाण नेहमीच कमी होते, केवळ यावेळी ते पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment